Tuesday, November 5, 2024

बंडखोरीची व्यापकता...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

बंडखोरीची व्यापकता

निवडणुकीचे वातावरण,
जेवढे काही तापलेले असते.
सपक्ष,अपक्ष आणि नि:पक्षांना,
तेवढे बंडखोरीने व्यापलेले असते.

ज्याच्या त्याच्या बंडखोरीला,
ज्याचा त्याचा विचार साक्ष असतो.
बंडखोरी कुणाचीही असली तरी,
तिचाही स्वतःचा एक पक्ष असतो.

कुणी चिंताग्रस्त;कुणी वादग्रस्त,
कुणाची बंडखोरी भंगली जाते !
निवडणूक कोणतीही असली तरी,
ती बंडखोरांमुळेच रंगली जाते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8731
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
5 नोव्हेंबर2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 22जानेवारी 2025वर्ष- चौथेअंक - 234 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 22जानेवारी 2025 वर्ष- चौथे अंक - 234 वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1gxeaHvvrvaer4LbXz1...