आजची वात्रटिका
--------------------------
आमदार निवास
फोडाफोडीच्या राजकारणामुळे,
सगळ्यांना चांगले दिवस येतात.
सगळे फाईव्ह स्टार हॉटेल्स,
चक्क आमदार निवास होतात.
कुणी कुणी थांबवले जातात,
कुणी कुणी मात्र थांबले जातात
कुणासाठी आमदार निवास,
कुणी कुणी मात्र तिथे डांबले जाते.
सगळेच होतात मूक बधिर,
फक्त पैसाच बोलला जातो !
हल्ली नव्या सरकारचा पाळणा,
हॉटेला हॉटेलातून हलला जातो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8749
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
23नोव्हेंबर2024
No comments:
Post a Comment