आजची वात्रटिका
--------------------------
मुख्यमंत्री पदाची स्पर्धा
कुणाला बाहेर काढले होते,
कुणी स्वतःच बाहेर पडले होते.
मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावाचून,
जनतेचे तरी कुठे अडले होते?
स्पर्धेमध्ये स्पर्धक नसतानाही,
मुख्यमंत्रीपदाची चर्चा रंगली गेली.
विरोधकांना निवडणूक वाईट,
सत्ताधाऱ्यांना मात्र चांगली गेली.
जो स्पर्धेमध्ये कधीच नव्हता,
नेमकी त्यानेच बाजी मारली आहे !
नेतृत्व वेगळे;चेहरा वेगळा?
ही शंका ती शंकाच उरली आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8754
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
29 नोव्हेंबर2024
No comments:
Post a Comment