Friday, November 8, 2024

प्रचार सभा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

प्रचार सभा

जसे कुणा कुणाला पटत नाही,
तसे कुणा कुणाला पटते आहे.
आम्हाला मात्र जुनीच भाषणं,
पुन्हा ऐकल्यासारखे वाटते आहे.

त्याच मुद्द्यांचे;त्याच गुद्धांचे,
सगळीकडे सारखेच पारायण आहे.
काही काही मुद्द्यांचे तर,
सगळीकडे सारखेच चोरायण आहे.

टिंगल आहे;टवाळी आहे,
आपल्या विरोधकांची खिल्ली आहे!
आपलेच दात;आपलेच ओठ,
कुणी कुणी तर माती खाल्ली आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8734
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
8 नोव्हेंबर2024
 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...