Tuesday, November 12, 2024

बॅग म्हणाली खोक्याला

आजची वात्रटिका
--------------------------

बॅग म्हणाली खोक्याला

त्यांचे झाले राजकारण,
ताप आपल्या डोक्याला.
धुसफुसत आणि फुसफुसत,
बॅग म्हणाली खोक्याला.

पेट्या झाल्या कालबाह्य,
चौकशी मात्र आपली आहे.
नाक्या-नाक्यावरती,
पोलिसांचीनजर टपली आहे.

घेणारे देणारे बाजूला,
धोक्यात मात्र वाहक आहे !
तुझ्याबरोबर माझीही,
बदनामी तर नाहक आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8738
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
12 नोव्हेंबर2024
 

No comments:

सोशल स्टेटस ......प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- सोशल स्टेटस आजच्यासारखा राजकीय स्वार्थ, आम्ही यापूर्वी कधीच पाहिला नाही. शुभेच्छासारख्या शुभेच्छांनासुद्...