Friday, November 22, 2024
लोकशाही दर्शन..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका------------------------
लोकशाही दर्शन
जसे अपक्षाकडून लुटले जाते,
तसे पक्षांकडूनही लुटले जाते.
लोकशाहीला नाचविण्याचे,
असूरी समाधान भेटले जाते.
नैतिकता नावाच्या गुणाला
पुन्हा पुन्हा हतबुद्ध केले जाते.
लोकशाही नावाच्या रांडेला,
पुन्हा पतिव्रता सिद्ध केले जाते.
लोकशाही आणि दंडेलशाहीत,
जमीन - अस्मानाचे मार्जिन आहे!
जे नागवितात लोकशाहीला,
त्यांनाच लोकशाही धार्जिण आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8748
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
22नोव्हेंबर2024
Subscribe to:
Post Comments (Atom)
लपाछपीचा खेळ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका -------------------- लपाछपीचा खेळ समाजकारणाआडचे राजकारण, लपविणे नेहमीच जड होत जाते. समाजकारणाआडचे राजकारण, कधी ना कधी उघड होत...
-
वात्रटिका : वर वर एक हलकाफुलका विनोदी काव्यप्रकार वाटत असला तरी केवळ विनोद निर्मिती हे वात्रटिकेचे एकच आणि अंतिम कार्य नाही. पश्चिमी ‘लिम्...

No comments:
Post a Comment