Tuesday, November 19, 2024

शेवटची रात्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

शेवटची रात्र

मिळेल ती संधी साधायला,
जो तो अगदी टपून असतो.
अपप्रचार असतो उघड,
प्रचार लपून छपून असतो.

अपप्रचाराला उजेडाची तर,
प्रचाराला अंधाराची साथ असते.
नोट के बदले व्होट,
प्रत्येक गल्लीबोळ गात असते.

जशी रात्र वैऱ्याची असते,
तशी ती सोयऱ्या धायऱ्याची असते !
लोकशाहीचे गाणे ऐकणार कोण?
रात्र मुक्या आणि बहिऱ्याची असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8745
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
19 नोव्हेंबर2024
 


No comments:

नेत्यांचे मित्र प्रेम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- नेत्यांचे मित्र प्रेम राजकीय नेत्यांच्या मित्रांवरती, लोक उगीचच दात खात असतात. ते पुंडलिका वर दे...चा गजर...