Saturday, November 16, 2024

हम सब एक है..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

हम सब एक है..

कुणीही कसाही इशारा केला तरी,
समजदाराला तेवढेच काफी आहे.
एक है तो....सेफ है,
ही कटेंगे - बटेंगेची सॉफ्ट कॉपी आहे.

ही काही योगा - योगीची गोष्ट नाही,
ज्याचा त्याचा वेगवेगळा अर्थ आहे.
मग कुणालाही नक्की समजू शकते,
आमचाच अर्थ किती सार्थ आहे?

नकारात्मक विचार नको,
आपण सगळे सकारात्मक होऊ या !
हम सब एक है....
हा पारंपरिक नारा पुन्हा देऊ या !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8742
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
16 नोव्हेंबर2024
 

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...