Friday, November 1, 2024

राजकीय 'नेम' बाजी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

राजकीय 'नेम' बाजी

अगदी बरोबर ' नेम ' धरून,
राजकीय डाव टाकले आहेत.
एकाच नावाचे अनेक उमेदवार,
विधानसभेला उभे ठाकले आहेत.

ज्याचे त्यालाच कळते आहे,
कशात काय?फटक्यात पाय आहे.
शेक्सपियरनेही विचारले नसते,
नावामध्ये काय आहे ?

कुणी म्हणू शकतो रडीचा डाव,
हे राजकारणच बायकी आहे !
केवळ नाम साधर्म्य हीच,
उमेदवारीची खरी लायकी आहे !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8729
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
1 नोव्हेंबर2024
 

No comments:

daily vatratika...22jane2025