Thursday, November 14, 2024

चिन्हांकित निवडणूक...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

चिन्हांकित निवडणूक

उमेदवार आणि पक्षापेक्षाही,
चिन्ह महत्त्वाचे ठरते आहे.
सामान्य जनता सुद्धा,
चिन्हावरच मतदान करते आहे.

कुणासाठी चिन्ह सुचिन्ह आहे,
कुणासाठी चिन्ह दुश्चिन्ह आहे.
अपक्ष उमेदवारांचे तर,
सगळ्यांपेक्षाच भिन्न आहे.

ज्यांचे ज्यांचे निवडणूक चिन्ह,
दिसायला सेम टू सेम आहे !
त्यांच्यातल्या कुणाचा तरी,
निवडणुकीत नक्की गेम आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8740
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
14 नोव्हेंबर2024
 

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...