Friday, November 22, 2024

राजकीय व्यंग ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
--------------------------

राजकीय व्यंग 

असंगाशीच संग आहे,
जो तो सत्तेसाठी दंग आहे. 
आजचे राजकारण म्हणजे, 
बीभत्स राजकीय व्यंग आहे. 

परस्परांची टवाळी आहे, 
लोकशाहीची टिंगल आहे. 
अत्यंत हास्यास्पद अशी, 
राजकारणाची दंगल आहे.

विरोधाभासाचे धक्के तर,
सगळीकडूनच बसत आहेत !
याचा उलगडा न केलेला बरा,
कोण कुणावर हसत आहेत?

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8747
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
21नोव्हेंबर2024

 

No comments:

सोशल स्टेटस ......प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- सोशल स्टेटस आजच्यासारखा राजकीय स्वार्थ, आम्ही यापूर्वी कधीच पाहिला नाही. शुभेच्छासारख्या शुभेच्छांनासुद्...