Friday, November 22, 2024

बंडखोरांच्या टोळ्या ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

बंडखोरांच्या टोळ्या 

कुणी परत यायला लागले, 
कुणी परत जायला लागले. 
ज्यांना पक्षात घेणार नव्हते, 
त्यांनाच परत घ्यायला लागले. 

आपल्यासाठी धक्कादायक, 
त्यांना आवक-जावक सोपी आहे.
जाणारे येणारे खुशीत, 
निष्ठावंतांची मात्र गळचेपी आहे.

एकूणच काय तर सगळीकडे, 
निवडून येणाऱ्यांच्या मोळ्या आहेत !
आघाड्या आणि युत्या म्हणजे,
बंडखोरांच्या टोळ्या आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8746
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
20नोव्हेंबर2024

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...