Saturday, November 30, 2024

मूळ व्याधी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


 आजची वात्रटिका

--------------------------

मूळ व्याधी

पैसे वाटणारे जेवढे हरामखोर,
तेवढेच घेणारेही हरामखोर आहेत.
पैसे देणारे चोर असतील तर,
पैसे घेणारेही नक्की महाचोर आहेत.

चोरांना महाचोर सामील असतील तर,
चोरी झाली म्हणण्यात काही अर्थ नाही.
त्यांनाच बोंबाबोंब करण्याचा हक्क आहे,
ज्यांच्यामध्ये कसलाही स्वार्थ नाही.

सलेक्शनपासून इलेक्शनपर्यंत,
अगदी सगळीकडे सारखीच बोंब आहे !
सर्वांची मूळ व्याधी अशी की,
सगळ्यांमध्येच स्वार्थाचा कोंब आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8755
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
30 नोव्हेंबर2024

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...