Saturday, November 9, 2024

अप्रिय आठवण...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

अप्रिय आठवण

सुटलो बुवा एकदाचे...
असाच ज्याचा त्याचा इको आहे.
झाले गेले गंगेला मिळाले,
ईडीची आठवण कुणालाच नको आहे.

कुणाला लागली शांत झोप,
कुणामागे चौकशीचा खो खो आहे.
अंगावरती फुटतो काटा,
ईडीची आठवण कुणालाच नको आहे.

कुणी अंदर;कुणी बाहर,
कुणाची तऱ्हा फेको एके फेको आहे!
धाड.. धाड..धाड करते छाती,
ईडीची आठवण कुणालाच नको आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8735
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
9 नोव्हेंबर2024
 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...