Monday, November 11, 2024

लाचार नामा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

लाचार नामा

कुणीतरी जिंकते आहे,
कुणीतरी पडते आहे.
लाचारीची सवय मात्र,
मतदारांना पडते आहे.

सगळेच लाचार नसले तरी,
त्यांची संख्या मोठी आहे.
लोकशाही जिंदाबाद नारा
लाचारांच्याही ओठी आहे.

सत्तापालट झाला तरी,
लाचार कायम असतात!
स्वाभिमानी लोकांसाठी,
लोकशाहीचे नियम असतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8737
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
11 नोव्हेंबर2024
 

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...