Friday, November 15, 2024

जाहीरनाम्यांची औपचारिकता...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

जाहीरनाम्यांची औपचारिकता

सर्वांचे जाहीरनामे म्हणजे,
चक्क परस्परांच्या कॉप्या असतात.
सगळ्यांकडून जनतेला,
अगदी जगजाहीर टोप्या असतात.

जाहीरनाम्यातील आश्वासनांच्या,
थोड्याशा अलट्या पलट्या असतात.
आपला जाहीरनामा चोरल्याच्या,
त्यांच्या बोंबासुद्धा उलट्या असतात.

मित्रपक्ष बदलले गेले तरी,
जाहीरनाम्यात फरक पडत नाही !
जाहीरनामा म्हणजे औपचारिकता,
त्याच्याशिवाय काहीच नडत नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8741
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
15 नोव्हेंबर2024
 

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...