Sunday, November 10, 2024

घुसखोरीचा भावार्थ..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

घुसखोरीचा भावार्थ

काल तिकडे दिसणारे,
आज इकडे दिसू लागले.
जिथे ज्याला घुसता येईल,
तिथे तिथे ते घुसू लागले.

घुसखोरांच्या घुसखोरीला,
काळाचे काही बंधन नाही.
घुसखोरी ती घुसखोरी,
निष्ठा काही आंदण नाही.

प्रत्येकाच्या घुसखोरीला,
जसे वेगवेगळे नाव आहे !
तसे त्यांच्या येण्या जाण्याचा,
वेगवेगळा भाव आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8736
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
10 नोव्हेंबर2024
 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...