Monday, November 18, 2024

कुसंगती आणि विसंगती....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

कुसंगती आणि विसंगती

जसे लोकांना कळत नाही,
तसे त्यांचे त्यांनाही कळत नाही.
कोण कोणाच्या विरोधात?
याचे उत्तर त्यांनाही मिळत नाही.

कालची विसंगती निस्तरेपर्यंत,
नवी विसंगती समोर येते आहे.
काल केलेली सावरासावर,
रोज नव्याने गोते खाते आहे.

एक है तो... सेफ है...
तरीही सर्वांच्याच तोडी नारा आहे !
बटेंगे तो कटेंगे.... चा अर्थ,
कुणी न सांगितलेलाच बरा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8744
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
18 नोव्हेंबर2024
 

No comments:

सोशल स्टेटस ......प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- सोशल स्टेटस आजच्यासारखा राजकीय स्वार्थ, आम्ही यापूर्वी कधीच पाहिला नाही. शुभेच्छासारख्या शुभेच्छांनासुद्...