Sunday, November 17, 2024

प्रचाराच्या जाहिराती...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

प्रचाराच्या जाहिराती

जशा कुणासाठी तारक आहेत,
तशा कुणासाठी मारक आहेत.
कामगिरी आणि धोरणांपेक्षा,
जाहिराती परिणामकारक आहेत.

करावे टिचभर;दाखवावे हातभर,
अशी जाहिरातींची तऱ्हा आहे.
मीडियापासून सोशल मीडियापर्यंत,
फक्त जाहिरातींचाच मारा आहे.

शक्याबरोबर अशक्यसुद्धा,
ते जाहिरातींमधून फेकू लागले !
जाहिरातींची नशा चढवून,
सगळेच स्वप्नसुद्धा विकू लागले !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8743
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
15 नोव्हेंबर2024
 

No comments:

नेत्यांचे मित्र प्रेम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- नेत्यांचे मित्र प्रेम राजकीय नेत्यांच्या मित्रांवरती, लोक उगीचच दात खात असतात. ते पुंडलिका वर दे...चा गजर...