Wednesday, October 7, 2009

कार्यकर्त्यांचे पक्षांतर

***** आजची वात्रटिका *****
**********************

कार्यकर्त्यांचे पक्षांतर

जशी एक मेंढी
सगळ्या मेंढ्यांना घेवुन जाते.
तसे नेत्याच्या पक्षांतरातच
कार्यकर्त्यांचे पक्षांतर होवून जाते.

नेत्याचे शेपूट धरणे
एवढीच एक मात्रा असते !
नेत्यांसोबत कार्यकर्त्यांची
अशी बिनबोभाट यात्रा असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

1 comment:

Unknown said...

पूर्वी क्रांती मार्ग वर केवळ
क्रांतिकारक च चालत होते
पक्ष नव्हताच त्यांचा .
म्हणून पक्षांतर ची भानगड नव्हती

पण लक्षात कोण घेतो? ..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका..

आजची वात्रटिका -------------------------- पण लक्षात कोण घेतो? त्यांचे मतभेद फेक असतात, त्यांचे वाद-विवाद फेक असतात. जनतेत वाद लावणारे, आतून ...