***** आजची वात्रटिका *****
*********************
काव्य-शास्त्र
कविता रचली जात नाही,
कविता सूचली जात असते.
समाजमग्न कविताच
आत्मियतेने वाचली जात असते.
दांभिकतेची कातडी
कवितेने सोलली पाहिजे.
अन्याय,अत्याचार,शोषण,
याविरूद्ध कविता बोलली पाहिजे.
वृत्त,अलंकार इत्यादींनी
कवितेचे सौंदर्य वाढले जाते.
मात्र साधे,सरळ,सोपेच
या मनाचे त्या मनाला भिडले जाते.
कवितांच्या या सागरात
केवळ छंद म्हणून पोहू नका !
वैचारिक बैठक नसेल तर
केवळ कंड म्हणून लिहू नका !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
Sunday, January 31, 2010
पाचवा वेद
***** आजची वात्रटिका *****
*********************
पाचवा वेद
वेदांमध्ये जरी
जीवनाचा वेध आहे.
तरी राज्यघटना हाच
खरा पाचवा वेद आहे.
हाच पाचवा वेद
सर्वत्र पूजला पाहिजे !
अगदी रेड्यांच्याही मनी
हाच विचार रूजला पाहिजे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
*********************
पाचवा वेद
वेदांमध्ये जरी
जीवनाचा वेध आहे.
तरी राज्यघटना हाच
खरा पाचवा वेद आहे.
हाच पाचवा वेद
सर्वत्र पूजला पाहिजे !
अगदी रेड्यांच्याही मनी
हाच विचार रूजला पाहिजे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
डरकाळ्यांचे व्यसन
***** आजची वात्रटिका *****
**********************
डरकाळ्यांचे व्यसन
अंबानीला म्हणाले,
रिकामे ’उद्योग’ करू नका.
सचिनला म्हणाले,
राजकारणात शिरू नका.
शहारूखचे तर
त्यांनी ’खान’दान काढले आहे !
ऊठसूट डरकाळ्या फोडण्याचे
वाघाला व्यसनच जडले आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
**********************
डरकाळ्यांचे व्यसन
अंबानीला म्हणाले,
रिकामे ’उद्योग’ करू नका.
सचिनला म्हणाले,
राजकारणात शिरू नका.
शहारूखचे तर
त्यांनी ’खान’दान काढले आहे !
ऊठसूट डरकाळ्या फोडण्याचे
वाघाला व्यसनच जडले आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
Saturday, January 30, 2010
किमान अपेक्षा
***** आजची वात्रटिका *****
*********************
किमान अपेक्षा
स्वातंत्र्य मिळवायचे नाही
आयतेच आपल्या हाती आहे.
हुतात्त्म्यांच्या उपकाराचे ओझे
जन्मजात आपल्या माथी आहे.
हौतात्म्यांची संधी नाही
हुतात्त्म्यांची जाण ठेवू या !
स्वत:चे तर असतेच असते
जरा देशाचेही भान ठेवू या !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
*********************
किमान अपेक्षा
स्वातंत्र्य मिळवायचे नाही
आयतेच आपल्या हाती आहे.
हुतात्त्म्यांच्या उपकाराचे ओझे
जन्मजात आपल्या माथी आहे.
हौतात्म्यांची संधी नाही
हुतात्त्म्यांची जाण ठेवू या !
स्वत:चे तर असतेच असते
जरा देशाचेही भान ठेवू या !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
Friday, January 29, 2010
३०जानेवारी : ड्राय डे
***** आजची वात्रटिका *****
***********************
३०जानेवारी : ड्राय डे
रात्रीच्या हॅंग ओव्हरला
उतारा त्याला मिळॆना.
दारूची दुकाने बंद का?
हेही त्याला कळेना.
कॅलेंडरवर नजर जाताच
गोष्ट त्याला कळाली होती !
त्यावर तो पुटपुटला,
त्या नथुरामला आजच नेमकी
बरी सवड मिळाली होती !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
***********************
३०जानेवारी : ड्राय डे
रात्रीच्या हॅंग ओव्हरला
उतारा त्याला मिळॆना.
दारूची दुकाने बंद का?
हेही त्याला कळेना.
कॅलेंडरवर नजर जाताच
गोष्ट त्याला कळाली होती !
त्यावर तो पुटपुटला,
त्या नथुरामला आजच नेमकी
बरी सवड मिळाली होती !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
पद्म ते छद्म
***** आजची वात्रटिका *****
**********************
पद्म ते छद्म
ज्यांना द्यायला नको,
त्यांनाही द्यायला लागले.
पद्म पुरस्कार देखील
छद्म पुरस्कार व्हायला लागले
पद्म ते छद्म
अशी ही पायमल्ली आहे !
पुरस्कार आणि व्यवस्थेची
जगजाहिर खिल्ली आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
**********************
पद्म ते छद्म
ज्यांना द्यायला नको,
त्यांनाही द्यायला लागले.
पद्म पुरस्कार देखील
छद्म पुरस्कार व्हायला लागले
पद्म ते छद्म
अशी ही पायमल्ली आहे !
पुरस्कार आणि व्यवस्थेची
जगजाहिर खिल्ली आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
Thursday, January 28, 2010
राष्ट्रपुरूषांची तुलना
***** आजची वात्रटिका *****
**********************
राष्ट्रपुरूषांची तुलना
इतिहासाचा अचूक अंदाज
वर्तमानकाळी येवू शकत नाही.
म्हणूनच राष्ट्रपुरूषांची तुलना
एकमेकांशी होऊ शकत नाही.
आपण आपल्या सोईसाठी
थोडे्से डावे-उजवे करू शकतो !
सूर्य तर सूर्यच राहतील
आपण मात्र काजवे ठरू शकतो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
**********************
राष्ट्रपुरूषांची तुलना
इतिहासाचा अचूक अंदाज
वर्तमानकाळी येवू शकत नाही.
म्हणूनच राष्ट्रपुरूषांची तुलना
एकमेकांशी होऊ शकत नाही.
आपण आपल्या सोईसाठी
थोडे्से डावे-उजवे करू शकतो !
सूर्य तर सूर्यच राहतील
आपण मात्र काजवे ठरू शकतो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
Wednesday, January 27, 2010
महागाई एक्सप्रेस
***** आजची वात्रटिका *****
*********************
महागाई एक्सप्रेस
महागाई एक्सप्रेस तर
भलतीच सुपर आहे.
एकमेकांच्या डॊक्यावर
महागाईचे खापर आहे.
मतभेद आणि महागाई
समप्रमाणात वाढत आहेत !
डोके झाकायला जावे तर
पाय उघडे पडत आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
*********************
महागाई एक्सप्रेस
महागाई एक्सप्रेस तर
भलतीच सुपर आहे.
एकमेकांच्या डॊक्यावर
महागाईचे खापर आहे.
मतभेद आणि महागाई
समप्रमाणात वाढत आहेत !
डोके झाकायला जावे तर
पाय उघडे पडत आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
Tuesday, January 26, 2010
कल्पना आणि वास्तव
***** आजची वात्रटिका *****
**********************
कल्पना आणि वास्तव
ही फेकाफेकी नाही
ना आमच्या मनाचे आहे.
प्रजासत्ताक दिन सांगतो,
हे राज्य कुणाचे आहे ?
वरवर प्रजासत्ताक,
आतून नेतेसत्ताक राज्य आहे !
प्रजेपेक्षा खुर्चीच
सरसकट पूज्य आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
**********************
कल्पना आणि वास्तव
ही फेकाफेकी नाही
ना आमच्या मनाचे आहे.
प्रजासत्ताक दिन सांगतो,
हे राज्य कुणाचे आहे ?
वरवर प्रजासत्ताक,
आतून नेतेसत्ताक राज्य आहे !
प्रजेपेक्षा खुर्चीच
सरसकट पूज्य आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
Monday, January 25, 2010
Sunday, January 24, 2010
थंडीच्या टिप्स्
***** आजची वात्रटिका *****
*********************
थंडीच्या टिप्स्
थंडी काटेरी असली तरी
थंडी गोजरी करता येते.
थंड डोक्याने केली तर
थंडी साजरी करता येते.
थंडी खावी,थंडी प्यावी,
थंडीलाही नशा चढवू शकता.
थंडीला कपातच काय?
बाटलीतही बुडवू शकता.
हुडहूडत का होईना,
ज्याला किल्ला लढवता येतो !
थंडीचा उतरता पारा
त्यालाच खरा चढवता येतो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
*********************
थंडीच्या टिप्स्
थंडी काटेरी असली तरी
थंडी गोजरी करता येते.
थंड डोक्याने केली तर
थंडी साजरी करता येते.
थंडी खावी,थंडी प्यावी,
थंडीलाही नशा चढवू शकता.
थंडीला कपातच काय?
बाटलीतही बुडवू शकता.
हुडहूडत का होईना,
ज्याला किल्ला लढवता येतो !
थंडीचा उतरता पारा
त्यालाच खरा चढवता येतो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
’पोट’दुखी
***** आजची वात्रटिका *****
*********************
’पोट’दुखी
मतदारांना नादी लावून
काही गोष्टी पटवल्या जातात.
अनेक ठिकाणी उभे राहून
उगीच जागा आटवल्या जातात.
नियम पाठीशी असतोच,
सोबतीला राजकीय कंड असतो !
लवकरच लोकांच्या माथी
पोटनिवडणूकांचा भूर्दंड असतो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
*********************
’पोट’दुखी
मतदारांना नादी लावून
काही गोष्टी पटवल्या जातात.
अनेक ठिकाणी उभे राहून
उगीच जागा आटवल्या जातात.
नियम पाठीशी असतोच,
सोबतीला राजकीय कंड असतो !
लवकरच लोकांच्या माथी
पोटनिवडणूकांचा भूर्दंड असतो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
Friday, January 22, 2010
इन ’स्टंट’ गिरी
***** आजची वात्रटिका *****
*********************
इन ’स्टंट’ गिरी
कार्यकर्ते नको,नेते व्हा.
कॉंग्रेसचा नवा प्लॅन आहे.
नेतेगिरीचा इन्स्टंटपणा
खरोखरच छान आहे.
तरूण तुर्कांना तर
म्हातारे अर्क व्हायची गरज नाही !
जाहिरात ही जाहिरात असते,
तिची खात्री द्यायची गरज नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
*********************
इन ’स्टंट’ गिरी
कार्यकर्ते नको,नेते व्हा.
कॉंग्रेसचा नवा प्लॅन आहे.
नेतेगिरीचा इन्स्टंटपणा
खरोखरच छान आहे.
तरूण तुर्कांना तर
म्हातारे अर्क व्हायची गरज नाही !
जाहिरात ही जाहिरात असते,
तिची खात्री द्यायची गरज नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
दुधाला साखर साक्ष
***** आजची वात्रटिका *****
**********************
दुधाला साखर साक्ष
दुधात साखर नाही,
साखरेत दुध पडू शकते.
ते ज्योतिषी नसतानाही
भविष्य़ खरे ठरू शकते.
भविष्य़ाच्या सत्यतेला
साखरेची साक्ष आहे !
सामान्यांची डाळच शिजू द्यायची नाही
याकडे जातीने लक्ष आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
**********************
दुधाला साखर साक्ष
दुधात साखर नाही,
साखरेत दुध पडू शकते.
ते ज्योतिषी नसतानाही
भविष्य़ खरे ठरू शकते.
भविष्य़ाच्या सत्यतेला
साखरेची साक्ष आहे !
सामान्यांची डाळच शिजू द्यायची नाही
याकडे जातीने लक्ष आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
ऑस्करची हौस
***** आजची वात्रटिका *****
**********************
ऑस्करची हौस
ऑस्कर मिळाल्याने
माजायची गरज नाही.
ऑस्कर न मिळाल्याने
लाजायची गरज नाही.
जागतिक मानांकनासाठी
अगतिक व्हायचे कशाला ?
ऑस्करच्या बाहूलीला
महत्त्वच द्यायचे कशाला?
मिसळ ती मिसळ,
वडापाव तो वडापाव आहे !
याला पाश्चिमात्त्यांनी प्रमाणपत्र द्यावे,
आपली उगीचच हाव आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
**********************
ऑस्करची हौस
ऑस्कर मिळाल्याने
माजायची गरज नाही.
ऑस्कर न मिळाल्याने
लाजायची गरज नाही.
जागतिक मानांकनासाठी
अगतिक व्हायचे कशाला ?
ऑस्करच्या बाहूलीला
महत्त्वच द्यायचे कशाला?
मिसळ ती मिसळ,
वडापाव तो वडापाव आहे !
याला पाश्चिमात्त्यांनी प्रमाणपत्र द्यावे,
आपली उगीचच हाव आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
Thursday, January 21, 2010
मनोरंजन ते नेत्ररंजन
***** आजची वात्रटिका *****
*********************
मनोरंजन ते नेत्ररंजन
आयपीएलच्या लिलावनंतर
भरीस भर आहे.
वन डे आणि ट्वेंटी-20 वर
मनोरंजन कर आहे.
क्रिकेटसारख्या खेळाची
प्रतिमा भंजन होत आहे !
चिअर्स गर्ल्सच्या साक्षीने
नेत्ररंजन होत आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
*********************
मनोरंजन ते नेत्ररंजन
आयपीएलच्या लिलावनंतर
भरीस भर आहे.
वन डे आणि ट्वेंटी-20 वर
मनोरंजन कर आहे.
क्रिकेटसारख्या खेळाची
प्रतिमा भंजन होत आहे !
चिअर्स गर्ल्सच्या साक्षीने
नेत्ररंजन होत आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
चौथीच्या मुलांचे मनोगत
***** आजची वात्रटिका *****
***********************
चौथीच्या मुलांचे मनोगत
ज्यांना पोळ्या भाजायच्यात
त्यांना भाजून घेऊ द्या.
वेगळा विदर्भ करायचा तर
वार्षिक परीक्षा होऊ द्या.
आमचा इतिहास जोडण्याचा,
इथे भूगोल तुटला जाईल !
आमचे प्रश्न अवघड होऊन
विदर्भाचा प्रश्न सुटला जाईल !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
***********************
चौथीच्या मुलांचे मनोगत
ज्यांना पोळ्या भाजायच्यात
त्यांना भाजून घेऊ द्या.
वेगळा विदर्भ करायचा तर
वार्षिक परीक्षा होऊ द्या.
आमचा इतिहास जोडण्याचा,
इथे भूगोल तुटला जाईल !
आमचे प्रश्न अवघड होऊन
विदर्भाचा प्रश्न सुटला जाईल !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
Wednesday, January 20, 2010
अभिमत विद्यापीठं
***** आजची वात्रटिका *****
**********************
अभिमत विद्यापीठं
पूर्वी जे मत होते,
ते अभी- मत नाही.
विद्यापीठ म्हणवून घ्यायची
विद्यापीठांची पत नाही.
काल लक्षात यायच्या गोष्टी
आज लक्षात आल्या आहेत !
कुठे पवित्र ज्ञानगंगा ?
कुठे तुंबलेल्या नाल्या आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
**********************
अभिमत विद्यापीठं
पूर्वी जे मत होते,
ते अभी- मत नाही.
विद्यापीठ म्हणवून घ्यायची
विद्यापीठांची पत नाही.
काल लक्षात यायच्या गोष्टी
आज लक्षात आल्या आहेत !
कुठे पवित्र ज्ञानगंगा ?
कुठे तुंबलेल्या नाल्या आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
Monday, January 18, 2010
डबलरोल
**** आजची वात्रटिका *****
*********************
डबलरोल
टिकाकार भाट झाले की,
त्यात वेगळीच गंमत वाटते.
कालच्या टिकेची मग
आज शून्यच किंमत वाटते.
नकटी ती नकटी असते,
तिला नटवता येत नाही !
बदलेली पार्श्वभूमीही
कुणाला पटवता येत नाही !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
*********************
डबलरोल
टिकाकार भाट झाले की,
त्यात वेगळीच गंमत वाटते.
कालच्या टिकेची मग
आज शून्यच किंमत वाटते.
नकटी ती नकटी असते,
तिला नटवता येत नाही !
बदलेली पार्श्वभूमीही
कुणाला पटवता येत नाही !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
Sunday, January 17, 2010
राज्यपालपदाच्या अटी
***** आजची वात्रटिका *****
*********************
राज्यपालपदाच्या अटी
राज्यपाल पदासाठी
लोकांनी वाळीत टाकलेले लागतात.
त्याहून महत्त्वाची अट अशी की,
म्हातारपणाला टेकलेले लागतात.
ज्यांच्या नियुक्त्या होतात
जरा बघा त्यांचे किती वय असते ?
राज्यपाल पद म्हणजे
म्हातारपणाची सोय असते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
*********************
राज्यपालपदाच्या अटी
राज्यपाल पदासाठी
लोकांनी वाळीत टाकलेले लागतात.
त्याहून महत्त्वाची अट अशी की,
म्हातारपणाला टेकलेले लागतात.
ज्यांच्या नियुक्त्या होतात
जरा बघा त्यांचे किती वय असते ?
राज्यपाल पद म्हणजे
म्हातारपणाची सोय असते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
Saturday, January 16, 2010
सूर्यग्रहण
***** आजची वात्रटिका *****
*********************
सूर्यग्रहण
चंद्रकोर बघण्याची सवय
इथे चंद्रही कोरला होता.
आपले अस्त्तित्त्व दाखविताना
इथे चंद्रही विरला होता.
सूर्य झाला चंद्रमा,
चांदण्याही भाळल्या असत्या.
त्या नव्हत्या म्हणून बरे झाले,
त्याही रास खेळल्या असत्या.
ह्या सावल्यांच्या खेळावरती
कुणी अक्कल पाजळी्त होते
कुणी लुटला आनंद,
कुणी मंत्र उजळीत होते.
प्रकाशाच्या सम्राटालाही
ग्रहणामधून जावे लागते !
म्हणूनच ग्रहण कोणतेही असो
ते समजून घ्यावे लागते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
*********************
सूर्यग्रहण
चंद्रकोर बघण्याची सवय
इथे चंद्रही कोरला होता.
आपले अस्त्तित्त्व दाखविताना
इथे चंद्रही विरला होता.
सूर्य झाला चंद्रमा,
चांदण्याही भाळल्या असत्या.
त्या नव्हत्या म्हणून बरे झाले,
त्याही रास खेळल्या असत्या.
ह्या सावल्यांच्या खेळावरती
कुणी अक्कल पाजळी्त होते
कुणी लुटला आनंद,
कुणी मंत्र उजळीत होते.
प्रकाशाच्या सम्राटालाही
ग्रहणामधून जावे लागते !
म्हणूनच ग्रहण कोणतेही असो
ते समजून घ्यावे लागते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
Friday, January 15, 2010
Wednesday, January 13, 2010
पुरस्कारांचा चंगळवाद
***** आजची वात्रटिका *****
*********************
पुरस्कारांचा चंगळवाद
पुरस्कार वाटण्याची हौस
वाटणारे पुरवून घेतात.
ज्यांना मिरवायची हौस
तेसुद्धा मिरवून घेतात.
खिरापत वाटावी तसे
पुरस्कार वाटले जात आहेत !
वाट्टेल त्या किंमतीवर
पुरस्कार लाटले जात आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
*********************
पुरस्कारांचा चंगळवाद
पुरस्कार वाटण्याची हौस
वाटणारे पुरवून घेतात.
ज्यांना मिरवायची हौस
तेसुद्धा मिरवून घेतात.
खिरापत वाटावी तसे
पुरस्कार वाटले जात आहेत !
वाट्टेल त्या किंमतीवर
पुरस्कार लाटले जात आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
Tuesday, January 12, 2010
विद्यार्थी मित्रांनो......
***** आजची वात्रटिका *****
*********************
विद्यार्थी मित्रांनो......
तात्पुरत्या समस्यांवरती
कायमचे उपाय करू नका.
आत्महत्या करून असे
भित्र्यासारखे मरू नका.
यश अपयश येत राहिल,
अशी कच खाऊ नका.
क्षुल्लक क्षुल्लक गोष्टींसाठी
प्राणांचे मोल देवू नका.
आत्महत्या करून कुणाला
समस्यांचे उत्तर मिळलेले नाही !
तुम्ही तर विद्यार्थीच
अजून जीवनही कळलेले नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
*********************
विद्यार्थी मित्रांनो......
तात्पुरत्या समस्यांवरती
कायमचे उपाय करू नका.
आत्महत्या करून असे
भित्र्यासारखे मरू नका.
यश अपयश येत राहिल,
अशी कच खाऊ नका.
क्षुल्लक क्षुल्लक गोष्टींसाठी
प्राणांचे मोल देवू नका.
आत्महत्या करून कुणाला
समस्यांचे उत्तर मिळलेले नाही !
तुम्ही तर विद्यार्थीच
अजून जीवनही कळलेले नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
Monday, January 11, 2010
Saturday, January 9, 2010
थ्री इडीयट्स
***** आजची वात्रटिका *****
**********************
थ्री इडीयट्स
विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे
राज्यामध्ये लोण आहे.
कधी विचार केलाय,
याला जबाबदार कोण आहे ?
अवास्तव अपेक्षा,वाढती स्पर्धा,
जोडीला शिक्षण व्यवस्था आहे !
या ’थ्री इडीयट्स’मुळेच
ही जीवघेणी अवस्था आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
**********************
थ्री इडीयट्स
विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे
राज्यामध्ये लोण आहे.
कधी विचार केलाय,
याला जबाबदार कोण आहे ?
अवास्तव अपेक्षा,वाढती स्पर्धा,
जोडीला शिक्षण व्यवस्था आहे !
या ’थ्री इडीयट्स’मुळेच
ही जीवघेणी अवस्था आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
Friday, January 8, 2010
बुलेट-प्रुफ
***** आजची वात्रटिका *****
**********************
बुलेट-प्रुफ
कुणाचे गेले जीव,
गरम कुणाचे पॉकेट झाले.
टक्केवारीच्या व्यवहाराने
बुलेट्प्रुफ जॅकेट आले.
जॅकेट्च्या बुलेट्प्रुफपणाची
परीक्षा तर व्हायला पाहिजे !
ज्यांनी खरेदी केले
त्यांच्याच अंगावरती
प्रात्यक्षिक घ्यायला पाहिजे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
**********************
बुलेट-प्रुफ
कुणाचे गेले जीव,
गरम कुणाचे पॉकेट झाले.
टक्केवारीच्या व्यवहाराने
बुलेट्प्रुफ जॅकेट आले.
जॅकेट्च्या बुलेट्प्रुफपणाची
परीक्षा तर व्हायला पाहिजे !
ज्यांनी खरेदी केले
त्यांच्याच अंगावरती
प्रात्यक्षिक घ्यायला पाहिजे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
Thursday, January 7, 2010
समांतर सेन्सॉरशिप
***** आजची वात्रटिका *****
*********************
समांतर सेन्सॉरशिप
जसजसे चित्रपट
वास्तवाच्या जवळ जाऊ लागले.
तसतसे समांतर सेन्सॉर बोर्ड
अस्तित्वात येवू लागले.
धर्म,पक्ष,संघटनांचा
त्यांच्या हाती झेंडा असतो !
समांतर सेन्सॉरशिपला
ना बुडखा,ना शेंडा असतो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
*********************
समांतर सेन्सॉरशिप
जसजसे चित्रपट
वास्तवाच्या जवळ जाऊ लागले.
तसतसे समांतर सेन्सॉर बोर्ड
अस्तित्वात येवू लागले.
धर्म,पक्ष,संघटनांचा
त्यांच्या हाती झेंडा असतो !
समांतर सेन्सॉरशिपला
ना बुडखा,ना शेंडा असतो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
आकार ते निराकार
***** आजची वात्रटिका *****
*********************
आकार ते निराकार
कुठे खोडाला,कुठे फळाला
गणपतीचा आकार येतो.
भक्तांच्या नजरेत
गणपतीच साकार होतो
आंधळी श्रद्धा ठेवली की,
देव नको तिथे दिसू लागतो !
आपल्या देवभोळेपणामुळे
भक्त सहज फसू लागतो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
*********************
आकार ते निराकार
कुठे खोडाला,कुठे फळाला
गणपतीचा आकार येतो.
भक्तांच्या नजरेत
गणपतीच साकार होतो
आंधळी श्रद्धा ठेवली की,
देव नको तिथे दिसू लागतो !
आपल्या देवभोळेपणामुळे
भक्त सहज फसू लागतो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
Tuesday, January 5, 2010
सांग दर्पणा,मी दिसते कशी?
सांग दर्पणा,मी दिसते कशी?
हा दोष तुझा्च
तु त्यांना रोखले नाही.
ज्यांने हे व्रत राखयचे
त्यांनी राखले नाही.
जरी टिळक,आगरकर,गोखले,
आंबेडकर मज लाभले.
आज बघ मला कसे
नको नको त्यांनी दाबले.
नको रागवू मला,ही उद्ध्टपणे पुसते कशी?
सांग दर्पणा,मी दिसते कशी?
गल्ली दैनिकात चालते,
तेच दिल्ली दैनिकात चालते.
सांगती लोक किती जरी
त्यांचे घडेच पालथे.
लाजवितो कॅमेरा
लेखणी टॊचते आहे.
कसे सांगु मी तुला ?
कुठे कुठे बोचते आहे ?
माझेच मला माहित,मी हे सोसते कशी?
सांग दर्पणा,मी दिसते कशी?
परस्परच कारभार,
कुणी कारभारी बघतो.
लोकशाहीचा चौथा खांब,
आज चौथाई मागतो.
मजबूत होता पाया जो,
तोच नेमका उकरला जातोय.
ज्यावर लोकशाही उभी
तो खांब पोखरला जातोय.
सांग वाळवी ही इथे,घुसते कशी?
सांग दर्पणा,मी दिसते कशी?
ना टोचती खिळे मला,
झाले गुळगुळीत मी.
सप्तरंगांत रंगुनि सार्या
झाले बुळबुळीत मी.
ज्यांच्याविरुद्ध लढायचे
तेच माझे मालक झाले.
करणारांनी केले पोरके,
नको ते चालक-पालक झाले.
क्रुर ही थट्टा बघून,मनात मी हासते कशी?
सांग दर्पणा,मी दिसते कशी?
जेंव्हा मालक सांगतील तेंव्हा,
वृत्तपत्रीय युद्धाचे शंख फुकले जातात.
स्वागतमूल्याच्या नावाखाली,
रूपायातही अंक विकले जातात.
नंबर वन कोणचे?
फालतू प्रश्न पडतात इथे.
वाचकांना पटविण्यासाठी,
लक्की ड्रॉ ही काढतात इथे.
जिल्हावार आवृत्यांची, फौज पोसते कशी
सांग दर्पणा,मी दिसते कशी?
बातम्या लिहिण्या वेळ कोणा?
सरळ झेरॉक्स मारली जाते.
कॉपी-पेस्टच्या तंत्राने
बातमी सहज पेरली जाते.
त्यांचेच अनुकरण केले जाते
जे कुणी म्होरके असतात.
कधी अगदी विरामचिन्हासहित
अग्रलेखही सारखे असतात.
विचारांची ही दुर्मिळता,आज भासते कशी?
सांग दर्पणा,मी दिसते कशी?
लायकांची ओळ नसते,
नालायकांच्या आरत्या येतात.
लेखणीस शाई पाजता,
लेखण्यांना स्फुर्त्या येतात.
प्रसिद्धीपत्रकांच्या बातम्या,
पुरवण्याही प्रायोजित असतात.
फुकट्यांना विचारतो कोण?
ते काय पैसे मोजित असतात?
कुठे भाडे प्रतिसेकंद,कुठे कॉलम-सेंटीमीटरशी .
सांग दर्पणा,मी दिसते कशी?
इलेक्ट्रॉनिक तर प्रिंटच्या
दोन पावले पुढे आहे.
चोविस तास दामटलेले
ब्रेकींग न्युजचे घोडे आहे.
उद्या काया दाखवायचे?
हाच आजचा सवाल आहे.
स्टींग-बिंग फोडीत राहते
बेडरूमचा काय हालहवाल आहे?
माझीच मी मला, भेसूर भासते कशी?
सांग दर्पणा,मी दिसते कशी?
मिणमिणत्या का होईना,
अजून काही पणत्या आहेत.
जाहिराती आणि बातम्या
ओळख तु कोणत्या आहेत?
कोणत्या पापाची
आज मी फेड करते आहे ?
कसलीही न्युज असो,
आज ती पेड ठरते आहे.
मी शीलवान असूनही,सहज फसते कशी?
सांग दर्पणा,मी दिसते कशी?
मलाही ठाऊक आहे
पोटाला तर जाळले पाहिजे.
समाजसेवेचा आव आणता,
काही तरी पाळले पाहिजे.
लेखणीच्या धारला
आज कॅमेर्याचे बळ आहे !
मी तुझ्यासमोर ओकली,
ही जनमाणसाची कळ आहे !!
बारीक बघितले तर,आत्याबाईलाही असते मिशी
सांग दर्पणा,मी दिसते कशी?
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
मोबा.९९२३८४७२६९
Email-suryakant.dolase@gmail.com
हा दोष तुझा्च
तु त्यांना रोखले नाही.
ज्यांने हे व्रत राखयचे
त्यांनी राखले नाही.
जरी टिळक,आगरकर,गोखले,
आंबेडकर मज लाभले.
आज बघ मला कसे
नको नको त्यांनी दाबले.
नको रागवू मला,ही उद्ध्टपणे पुसते कशी?
सांग दर्पणा,मी दिसते कशी?
गल्ली दैनिकात चालते,
तेच दिल्ली दैनिकात चालते.
सांगती लोक किती जरी
त्यांचे घडेच पालथे.
लाजवितो कॅमेरा
लेखणी टॊचते आहे.
कसे सांगु मी तुला ?
कुठे कुठे बोचते आहे ?
माझेच मला माहित,मी हे सोसते कशी?
सांग दर्पणा,मी दिसते कशी?
परस्परच कारभार,
कुणी कारभारी बघतो.
लोकशाहीचा चौथा खांब,
आज चौथाई मागतो.
मजबूत होता पाया जो,
तोच नेमका उकरला जातोय.
ज्यावर लोकशाही उभी
तो खांब पोखरला जातोय.
सांग वाळवी ही इथे,घुसते कशी?
सांग दर्पणा,मी दिसते कशी?
ना टोचती खिळे मला,
झाले गुळगुळीत मी.
सप्तरंगांत रंगुनि सार्या
झाले बुळबुळीत मी.
ज्यांच्याविरुद्ध लढायचे
तेच माझे मालक झाले.
करणारांनी केले पोरके,
नको ते चालक-पालक झाले.
क्रुर ही थट्टा बघून,मनात मी हासते कशी?
सांग दर्पणा,मी दिसते कशी?
जेंव्हा मालक सांगतील तेंव्हा,
वृत्तपत्रीय युद्धाचे शंख फुकले जातात.
स्वागतमूल्याच्या नावाखाली,
रूपायातही अंक विकले जातात.
नंबर वन कोणचे?
फालतू प्रश्न पडतात इथे.
वाचकांना पटविण्यासाठी,
लक्की ड्रॉ ही काढतात इथे.
जिल्हावार आवृत्यांची, फौज पोसते कशी
सांग दर्पणा,मी दिसते कशी?
बातम्या लिहिण्या वेळ कोणा?
सरळ झेरॉक्स मारली जाते.
कॉपी-पेस्टच्या तंत्राने
बातमी सहज पेरली जाते.
त्यांचेच अनुकरण केले जाते
जे कुणी म्होरके असतात.
कधी अगदी विरामचिन्हासहित
अग्रलेखही सारखे असतात.
विचारांची ही दुर्मिळता,आज भासते कशी?
सांग दर्पणा,मी दिसते कशी?
लायकांची ओळ नसते,
नालायकांच्या आरत्या येतात.
लेखणीस शाई पाजता,
लेखण्यांना स्फुर्त्या येतात.
प्रसिद्धीपत्रकांच्या बातम्या,
पुरवण्याही प्रायोजित असतात.
फुकट्यांना विचारतो कोण?
ते काय पैसे मोजित असतात?
कुठे भाडे प्रतिसेकंद,कुठे कॉलम-सेंटीमीटरशी .
सांग दर्पणा,मी दिसते कशी?
इलेक्ट्रॉनिक तर प्रिंटच्या
दोन पावले पुढे आहे.
चोविस तास दामटलेले
ब्रेकींग न्युजचे घोडे आहे.
उद्या काया दाखवायचे?
हाच आजचा सवाल आहे.
स्टींग-बिंग फोडीत राहते
बेडरूमचा काय हालहवाल आहे?
माझीच मी मला, भेसूर भासते कशी?
सांग दर्पणा,मी दिसते कशी?
मिणमिणत्या का होईना,
अजून काही पणत्या आहेत.
जाहिराती आणि बातम्या
ओळख तु कोणत्या आहेत?
कोणत्या पापाची
आज मी फेड करते आहे ?
कसलीही न्युज असो,
आज ती पेड ठरते आहे.
मी शीलवान असूनही,सहज फसते कशी?
सांग दर्पणा,मी दिसते कशी?
मलाही ठाऊक आहे
पोटाला तर जाळले पाहिजे.
समाजसेवेचा आव आणता,
काही तरी पाळले पाहिजे.
लेखणीच्या धारला
आज कॅमेर्याचे बळ आहे !
मी तुझ्यासमोर ओकली,
ही जनमाणसाची कळ आहे !!
बारीक बघितले तर,आत्याबाईलाही असते मिशी
सांग दर्पणा,मी दिसते कशी?
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
मोबा.९९२३८४७२६९
Email-suryakant.dolase@gmail.com
Monday, January 4, 2010
थंडीचे अनुभव
***** आजची वात्रटिका *****
*********************
थंडीचे अनुभव
ज्याला मानवायची असते
त्यालाच मानवली जाते.
ज्याला जाणवायची असते
त्यालाच जाणवली जाते.
कितीही वाजली तरी,
तिचा आवाज मात्र होत नाही !
एकट्या-दुकट्याला काही
थंडी साजरी करता येत नाही !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
*********************
थंडीचे अनुभव
ज्याला मानवायची असते
त्यालाच मानवली जाते.
ज्याला जाणवायची असते
त्यालाच जाणवली जाते.
कितीही वाजली तरी,
तिचा आवाज मात्र होत नाही !
एकट्या-दुकट्याला काही
थंडी साजरी करता येत नाही !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
सरकारी मानसिकता
***** आजची वात्रटिका *****
*********************
सरकारी मानसिकता
फुकटची सुट्टी मिळाली की,
कर्मचारी सुखावले जातात.
हक्काची सुट्टी गेले की,
कर्मचारी दुखावले जातात.
कर्मचार्यांना वाटते,
सुट्टीत जयंत्या,पुण्यतिथ्यांचा,
व्यत्यय यायला नको होता
महापुरूषांनी जन्मसुद्धा
सुट्टीत घ्यायला नको होता.
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
*********************
सरकारी मानसिकता
फुकटची सुट्टी मिळाली की,
कर्मचारी सुखावले जातात.
हक्काची सुट्टी गेले की,
कर्मचारी दुखावले जातात.
कर्मचार्यांना वाटते,
सुट्टीत जयंत्या,पुण्यतिथ्यांचा,
व्यत्यय यायला नको होता
महापुरूषांनी जन्मसुद्धा
सुट्टीत घ्यायला नको होता.
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
Sunday, January 3, 2010
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....
एरव्ही बोललेही नसते,
पण माझ्या विचारांचे
तुम्ही घोटून घोटून क्रिम केलेय.
चक्क माझी देवी बनवून
मला फोटोमध्ये फ्रेम केलेय.
जमेल तेंव्हा,जमेल तसे
माझे सोईनुसार कौतुक करता.
खरे दु:ख याचे की,
तुम्ही मला गृहित धरता.
त्याचा राग मी तुमच्यासमोर खोलतेय..
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....
कुर्हाडीचा दांडा गोतास काळ व्हावा,
सगळ्या गोष्टी डोक्यावरून गेल्यात.
ज्या माझ्या वारसा सांगतात,
त्याच बेईमान झाल्यात.
असे होईल,मला काय माहित?
मला कुठे पुढचे दिसले होते?
एका वेगळ्या जगासाठी
मी शिव्याशाप,
दगडाबरोबर शेणही सोसले होते.
तुमच्याच शब्दात सांगायचे तर
रात्रंदिवस घासले होते.
आज मी कसले घाव झेलतेय?
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....
ही कही उपकाराची भाषा नाही.
आजच्या बाजारू समाजसेवेसारखा
हा बेंडबाजा अगर ताशा नाही.
मी विसरून गेले होते,
आम्ही कोणकोणते विष पचवले आहे.
हल्ली मात्र तुम्ही
आमच्या आत्मसन्माला डिचवले आहे.
म्हनूनच तुमच्या बहिर्या कानी
हे गार्हाणे घालतेय.
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....
माय मावल्यांनो,लेकीबाळींनो.
तुम्ही शिकलात सवरलात.
पण नको तेवढ्या शहाण्या झालात.
विकृत स्त्रीमुक्तीच्या
प्रत्येकजणी कहाण्या झालात.
माझा वारसा सांगून,
स्वार्थासाठी राबता आहात.
या सगळ्या संतापापुढे
आज मी भिड्भाड भुलतेय.....
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....
बाईपणाचे दु:ख काय असते?
मी तुमच्यापेक्षा जास्त भोगलेय.
आरशात पाहून सांगा,
मी सावित्रीच्या शब्दाला जागलेय?
तकलादू आणि भंपक
स्त्रीमुक्तेची नशा
तुम्हांला आज चढली आहे.
कपडे बदलेले की,
पुरोगामी होता येते,
ही फॅशन तुम्ही पाडली आहे.
शिकली सवरलेली माझी लेक
संस्कृतीच्या नावाखाली
नाकाने कांदे सोलतेय..
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....
मान नको,पान नको,
आमचे उपकारही फेडू नका.
किर्तन-बिर्तन काही नको
झोडायची म्हनून
भाषणंही झोडू नका.
वाघिणीचे दूध पिऊन
कुत्र्यांसारखा गोंडा घोळीत आहात.
धर्म-संस्काराच्या नावाखाली
टाकाऊ परंपरा पाळीत आहात.
तुमच्या चिपाडलेल्या डोळ्यात
म्हनून हे अंजन घालतेय...
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....
तुम्हांला आज
काहीसुद्धा सोसायचे नाही.
काढणारे काढीत आहेत
तुम्हांला शाळा काढीत बसायचे नाही.
तुम्ही फक्त पुरोगामित्त्वाचा
खरा वसा घ्यायला पाहिजे.
एखादा दुसरा ’यशवंत’ शोधून
त्याला आधार द्यायला पाहिजे,
शाळा कॉलेजचे पिक तर
हायब्रिडसारखे डोलतेय.....
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....
मनमानी आणि स्वैराचाराला
पुरोगामित्त्वाचे लेबल लावणे,
यासारखी दुसरी सोपी युक्ती नाही.
फक्त नवरे बदलणे,
घटस्फोट घेणे,
ही काही स्त्रीमुक्ती नाही.
माझी खरी लेक तीच,
जी सत्यापूढे झुकत नाही.
सावित्री आणि ज्योतिबांपूढे
आंधळेपणाने माथा टेकत नाही.
माझी खरी लेक तीच,
आम्हांलासुद्धा नव्याने तपासून
स्वत:ची भाषा बोलतेय.
आमचाही वसा
तावून-सुलाखुन पेलतेय.....
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....
आमच्याच मातीत,
आमच्याच लेकरांकडून
दूजाभाव बघावा लागला.
माझा फोटो लावण्यासाठीही
सरकारी जी.आर.निघावा लागला.
आपल्या सोईचे नसले की,
विचारांकडेही कानाडॊळा होतो.
समाजासाठी काही करायचे म्हटले की,
पोटात प्लेगचा गोळा येतो.
ज्योतिबांशिवाय सावित्री,
सावित्रीशिवाय ज्योतिबा,
समजून घेता येणार नाही.
विचारांची ही ज्योती,
एकटी-एकटी नेता येणार नाही.
सुनांना लागावे म्हणून तर
लेकींनो, तुम्हांला बोलतेय....
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय...
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....
एरव्ही बोललेही नसते,
पण माझ्या विचारांचे
तुम्ही घोटून घोटून क्रिम केलेय.
चक्क माझी देवी बनवून
मला फोटोमध्ये फ्रेम केलेय.
जमेल तेंव्हा,जमेल तसे
माझे सोईनुसार कौतुक करता.
खरे दु:ख याचे की,
तुम्ही मला गृहित धरता.
त्याचा राग मी तुमच्यासमोर खोलतेय..
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....
कुर्हाडीचा दांडा गोतास काळ व्हावा,
सगळ्या गोष्टी डोक्यावरून गेल्यात.
ज्या माझ्या वारसा सांगतात,
त्याच बेईमान झाल्यात.
असे होईल,मला काय माहित?
मला कुठे पुढचे दिसले होते?
एका वेगळ्या जगासाठी
मी शिव्याशाप,
दगडाबरोबर शेणही सोसले होते.
तुमच्याच शब्दात सांगायचे तर
रात्रंदिवस घासले होते.
आज मी कसले घाव झेलतेय?
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....
ही कही उपकाराची भाषा नाही.
आजच्या बाजारू समाजसेवेसारखा
हा बेंडबाजा अगर ताशा नाही.
मी विसरून गेले होते,
आम्ही कोणकोणते विष पचवले आहे.
हल्ली मात्र तुम्ही
आमच्या आत्मसन्माला डिचवले आहे.
म्हनूनच तुमच्या बहिर्या कानी
हे गार्हाणे घालतेय.
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....
माय मावल्यांनो,लेकीबाळींनो.
तुम्ही शिकलात सवरलात.
पण नको तेवढ्या शहाण्या झालात.
विकृत स्त्रीमुक्तीच्या
प्रत्येकजणी कहाण्या झालात.
माझा वारसा सांगून,
स्वार्थासाठी राबता आहात.
या सगळ्या संतापापुढे
आज मी भिड्भाड भुलतेय.....
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....
बाईपणाचे दु:ख काय असते?
मी तुमच्यापेक्षा जास्त भोगलेय.
आरशात पाहून सांगा,
मी सावित्रीच्या शब्दाला जागलेय?
तकलादू आणि भंपक
स्त्रीमुक्तेची नशा
तुम्हांला आज चढली आहे.
कपडे बदलेले की,
पुरोगामी होता येते,
ही फॅशन तुम्ही पाडली आहे.
शिकली सवरलेली माझी लेक
संस्कृतीच्या नावाखाली
नाकाने कांदे सोलतेय..
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....
मान नको,पान नको,
आमचे उपकारही फेडू नका.
किर्तन-बिर्तन काही नको
झोडायची म्हनून
भाषणंही झोडू नका.
वाघिणीचे दूध पिऊन
कुत्र्यांसारखा गोंडा घोळीत आहात.
धर्म-संस्काराच्या नावाखाली
टाकाऊ परंपरा पाळीत आहात.
तुमच्या चिपाडलेल्या डोळ्यात
म्हनून हे अंजन घालतेय...
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....
तुम्हांला आज
काहीसुद्धा सोसायचे नाही.
काढणारे काढीत आहेत
तुम्हांला शाळा काढीत बसायचे नाही.
तुम्ही फक्त पुरोगामित्त्वाचा
खरा वसा घ्यायला पाहिजे.
एखादा दुसरा ’यशवंत’ शोधून
त्याला आधार द्यायला पाहिजे,
शाळा कॉलेजचे पिक तर
हायब्रिडसारखे डोलतेय.....
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....
मनमानी आणि स्वैराचाराला
पुरोगामित्त्वाचे लेबल लावणे,
यासारखी दुसरी सोपी युक्ती नाही.
फक्त नवरे बदलणे,
घटस्फोट घेणे,
ही काही स्त्रीमुक्ती नाही.
माझी खरी लेक तीच,
जी सत्यापूढे झुकत नाही.
सावित्री आणि ज्योतिबांपूढे
आंधळेपणाने माथा टेकत नाही.
माझी खरी लेक तीच,
आम्हांलासुद्धा नव्याने तपासून
स्वत:ची भाषा बोलतेय.
आमचाही वसा
तावून-सुलाखुन पेलतेय.....
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....
आमच्याच मातीत,
आमच्याच लेकरांकडून
दूजाभाव बघावा लागला.
माझा फोटो लावण्यासाठीही
सरकारी जी.आर.निघावा लागला.
आपल्या सोईचे नसले की,
विचारांकडेही कानाडॊळा होतो.
समाजासाठी काही करायचे म्हटले की,
पोटात प्लेगचा गोळा येतो.
ज्योतिबांशिवाय सावित्री,
सावित्रीशिवाय ज्योतिबा,
समजून घेता येणार नाही.
विचारांची ही ज्योती,
एकटी-एकटी नेता येणार नाही.
सुनांना लागावे म्हणून तर
लेकींनो, तुम्हांला बोलतेय....
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय...
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
Saturday, January 2, 2010
चतुर्थीचा चंद्र
***** आजची वात्रटिका *****
*********************
चतुर्थीचा चंद्र
सावित्री,तुझ्या लेकी
शिकूनसुद्धा हूकलेल्या आहेत.
शिकणं म्हणजे नोकरी करणे
एवढेच त्या शिकलेल्या आहेत.
दिसतं ते लिहितो,
दिसतो ते बोलतो,
उगीच नावं ठेवत नाहीत !
चतुर्थीचा चंद्र पाहिल्याशिवाय
अजूनही त्या जेवत नाहीत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
*********************
चतुर्थीचा चंद्र
सावित्री,तुझ्या लेकी
शिकूनसुद्धा हूकलेल्या आहेत.
शिकणं म्हणजे नोकरी करणे
एवढेच त्या शिकलेल्या आहेत.
दिसतं ते लिहितो,
दिसतो ते बोलतो,
उगीच नावं ठेवत नाहीत !
चतुर्थीचा चंद्र पाहिल्याशिवाय
अजूनही त्या जेवत नाहीत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
सखे,सावित्री....
***** आजची वात्रटिका *****
**********************
सखे,सावित्री....
आम्ही सावि्त्रीच्या लेकी,
पूजा वडाची करीतो.
गर्भातल्या लेकी आम्ही
गर्भातच मारीतो.
सखे,सावित्री...सांग,
तुझा असा कसा बाई वसा ?
आमच्या रक्तातला अंधार
सांग जात नाही कसा?
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
**********************
सखे,सावित्री....
आम्ही सावि्त्रीच्या लेकी,
पूजा वडाची करीतो.
गर्भातल्या लेकी आम्ही
गर्भातच मारीतो.
सखे,सावित्री...सांग,
तुझा असा कसा बाई वसा ?
आमच्या रक्तातला अंधार
सांग जात नाही कसा?
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
सोने-नाणे
***** आजची वात्रटिका *****
**********************
सोने-नाणे
ग्राहकांना भुलविणे
नेहमी चालुच असते.
साबणावर सोन्याची
नेहमी लालुच असते.
ऑफरवर ऑफर
ऑफरची रेस आहे !
सोन्याच्या नाण्याऐवजी
हातामध्ये फेस आहे !!
-सूर्यकांत डॊळ्से,पाटोदा (बीड)
**********************
सोने-नाणे
ग्राहकांना भुलविणे
नेहमी चालुच असते.
साबणावर सोन्याची
नेहमी लालुच असते.
ऑफरवर ऑफर
ऑफरची रेस आहे !
सोन्याच्या नाण्याऐवजी
हातामध्ये फेस आहे !!
-सूर्यकांत डॊळ्से,पाटोदा (बीड)
Subscribe to:
Posts (Atom)
कॉमेडी..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका -------------------- कॉमेडी लोकशाहीची झाली कॉमेडी, कॉमेडीयनला चांगली संधी आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने, सगळीकडूनच ...

-
आजची वात्रटिका ---------------------- गेट-टुगेदर भूतकाळातले मित्र -मैत्रिणी, खूप वर्षानंतर भेटू लागले. उजळून येतात आठवणी, छोटे झाल्यासारखे व...