Saturday, January 9, 2010

थ्री इडीयट्स

***** आजची वात्रटिका *****
**********************

थ्री इडीयट्स

विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे
राज्यामध्ये लोण आहे.
कधी विचार केलाय,
याला जबाबदार कोण आहे ?

अवास्तव अपेक्षा,वाढती स्पर्धा,
जोडीला शिक्षण व्यवस्था आहे !
या ’थ्री इडीयट्स’मुळेच
ही जीवघेणी अवस्था आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

2 comments:

विक्रम एक शांत वादळ said...

अवास्तव अपेक्षा,वाढती स्पर्धा,
जोडीला शिक्षण व्यवस्था आहे !
या ’थ्री इडीयट्स’मुळेच
ही जीवघेणी अवस्था आहे !!

agadi manatale

mastach

Prash said...

मला असे वाटत नाही ! मुलांना उलट त्यातून प्रोत्साहन व उत्साह मिळायला पाहिजे! उगाच शिक्षण पदधतीच्या चुकांना थ्री इडीयटस या चित्रपटावर लावणे नाही. आपल्या इथे अमेरिका किवां ब्रिटन येथे जशी शिक्षणपद्धती आहे तशी अवलंबायला पाहिजे! तिथे काही विशिष्ट वयानंतर मुलांना त्यांना आवडेल त्या विषयांचेच शिक्षण दिले जाते व त्यामुळे विदयार्थी कधी निराश होत नाहीत! अश्याने ते त्यांची पूर्ण क्षमता वापरून आभ्यास करतात.

दैनिक वात्रटिका l 19नोव्हेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 172 वा l पाने -39

दैनिक वात्रटिका l 19नोव्हेंबर2024  वर्ष- चौथे अंक - 172 वा l पाने -39 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/18nApDbukudT7hlNNJ...