गुणपत्रकातले गुण हेच गुणवत्तेचे मानक आहे. कुणापेक्षा किती जास्त? हाच गुणवत्तेचा गुणक आहे. गुणपत्रिकेतील गुण दिसतात अंगातल्या गुणांचा पत्ता नाही! केवळ आकडेवारी म्हणजे काही सर्वागीण गुणवत्ता नाही!!
बॅट म्हणाली बॉलला बघ आपला केवढा थाट आहे. राज्य अंधारात असतानाही आयपीएलमध्ये चमचमाट आहे. यावर बॉल उत्तरला, तोंडाचा पट्टा जरा आवरता घे, क्रिकेट सभ्य माणसांचा खेळ आहे! हौद से गई वो बुँद से नही आती म्हणूनच तर ही वेळ आहे!!