Thursday, December 31, 2020

31 डिसेंबर

 आजची वात्रटिका

----------------------------
31 डिसेंबर
खाणारे खात असतात,
पिणारे पित असतात.
दरवर्षीचे 31डिसेंबर,
बदनाम होत असतात.
मारणारे मजा मारतात,
31 डिसेंबरवर आरोप असतो !
31 डिसेंबरच्या साक्षीने,
सरत्या वर्षाला निरोप असतो !
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------
फेरफटका-7487
दैनिक झुंजार नेता
31डिसेंबर2020

ग्लोबल गटारी

आजची वात्रटिका
----------------------------

ग्लोबल गटारी

पेतांडांसाठी प्रत्येक दिवस, जसा शुभ,तसा बेस्ट असतो. जणू ग्लोबल गटारी म्हणजे, दरवर्षीचा'थर्टी फर्स्ट'असतो.

पेतांडाचा होतो जल्लोष, पेताडांची लयलूट असते ! नव्या वर्षाच्या स्वागतासाठी, जगभरात प्यायची सूट असते  !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ----------------------------- चिमटा-6017 दैनिक पुण्यनगरी 31डिसेंबर2020

Wednesday, December 30, 2020

दैनिक वात्रटिका

दैनिक वात्रटिका
अंक 72 वा
30डिसेंबर2020
डाऊनलोड लिंक-
Image may contain: 1 person, text that says 'खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेलेऑनलाईन दैनिक वर्ष- पहिले अक ७२वा ३०डिसेंबर२०२० पाने- ४६ तातटिका दैनिक संपादक सूर्यकांत डोळसे प्रसिद्ध वात्रटिकाकार सलाम कविवर्य मंगेश पाडगावकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन पाडगावकर तुम्हाला अखेरचा You Tube मर्यकांती LIVE सलाम! सूर्यकांत डोळसे आवाज सूर्यकांत डोळसे'

न्यू कोरोना

आजची वात्रटिका
----------------------------
न्यू कोरोना
ब्रिटनमधून आलेला कोरोना,
पहिल्यापेक्षाही ग्रेट आहे.
पहिल्यापेक्षा त्याच्या वाढीचा,
चक्क सत्तार पट रेट आहे.
पहिला कोरोना जाण्याअगोदर,
नवा कोरोना हजर आहे !
बेफिकीर आणि गाफिलांवर
कोरोनाची मेहरनजर आहे !!
-,,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------
फेरफटका-7486
दैनिक झुंजार नेता
30डिसेंबर2020
------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा

राना-वत

आजची वात्रटिका
----------------------------
राना-वत
याला खुणावत आहे,
त्याला खुणावत आहे.
तोऱ्यातली कंगणा,
हल्ली राना-वत आहे.
कुणाची टिंगल नको,
नाहक टवाळी नको !
नसत्या चोंबडेपणाबरोबर,
जिभही लव्हाळी नको !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------
चिमटा-6016
दैनिक पुण्यनगरी
30डिसेंबर2020
--------------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा. माझ्या दैनिक पुण्यनगरीतील 'चिमटा' आणि दैनिक झुंजार नेता तील 'फेरफटका' या सदरातील आणि दैनिक वात्रटिका तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील सतरा हजारांपैकी, सहा हजारांहून जास्त वात्रटिका वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !! https://suryakantdolase.blogspot.com
---------------------------
*विशेष सूचना-*
1)माझ्या वात्रटिकात काही आक्षेपार्ह वाटले तर माझ्या मूळ पोस्ट तपासाव्यात किंवा माझ्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून खात्री करावी.
2)सदरील वात्रटिकांमध्ये काही टायपिंग मिस्टेक असेल तर मला त्वरित कळवा.
3) जे वात्रटिका शेअर करीत आहेत त्यांचे विशेष आभार.
4)आता रोज नव्या बरोबर अनेक जुन्या वात्रटिकांचा खजिना वाचण्यासाठी वाचत रहा *दैनिक वात्रटिका दीपोत्सव2020* डाऊनलोड करा।वाचा।इतरांना शेअर करा।प्रतिक्रिया कळवा https://drive.google.com/.../1yaZylz7.../view... खास वात्रटिकांसाठी वाहिलेले ऑनलाईन दैनिक !!
5) वात्रटिकांविषयी सर्व काही एकाच वेळी...एकाच ठिकाणी !! अर्थात *साप्ताहिक* *सूर्यकांती* खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पाहिले आणि एकमेव ऑनलाईन साप्ताहिक https://weeklysuryakanti.blogspot.com
6)साप्ताहिक सूर्यकांती दीपोत्सव2020 डाऊनलोड लिंक -https://drive.google.com/.../1J.../view...
7) माझ्या *सूर्यकांती Live* या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या...लाईक करा...*सबस्क्राईब* करा !! https://www.youtube.com/user/suryakantdolase
8) साप्ताहिक सूर्यकांती चा ताजा अंक डाऊनलोड लिंक
9) चिमटा:जुलै2020 वात्रटिका संग्रह डाऊनलोड लिंक-
10) फेरफटका जुलै2020
वात्रटिका संग्रह
डाऊनलोड लिंक-
-सूर्यकांत डोळसे
30डिसेंबर2020

Tuesday, December 29, 2020

दैनिक वात्रटिका 24डिसेंबर2020

 दैनिक वात्रटिका

24डिसेंबर2020
डाऊनलोड लिंक-

दैनिक वात्रटिका 25डिसेंबर2020

 दैनिक वात्रटिका

25डिसेंबर2020
डाऊल्लोड लिंक-

दैनिक वात्रटिका 27डिसेंबर2020

 दैनिक वात्रटिका

27डिसेंबर2020
डाऊनलोड लिंक-

दैनिक वात्रटिका 27डिसेंबर2020

दैनिक वात्रटिका
27डिसेंबर2020
डाऊनलोड लिंक-

दैनिक वात्रटिका अंक 70 वा 28डिसेंबर2020

दैनिक वात्रटिका
अंक 70 वा
28डिसेंबर2020
डाऊनलोड लिंक-

सातवी पास

सातवी पास
----------------------------
सातवी पास
सातवी पास नसणारे,
आई-बापाशी तंडायला लागले.
कुणी सातवी पास असल्याचे,
कागदी पुरावे धुंडायला लागले.
ग्राम पंचायत निवडणूकीत,
आंगठेबहाद्दरांना ठेंगा आहे !
शिक्षणाच्या आयचा घो ss
पॅनलप्रमुखांचा भोंगा आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-6015
दैनिक पुण्यनगरी
29डिसेंबर2020

लोकप्रियता

आजची वात्रटिका
----------------------------

लोकप्रियता

कोरोनाच्या अंधुंदीचा कसून तपास झाला पाहिजे. कुणीतरी म्हणाले, तपास ईडीकडे दिला पाहिजे.

ईडी जशी सक्रिय झाली, तशी ती लोकप्रिय झाली आहे ! जो तो विचारतोय, आज कुणाला नोटीस आली आहे?

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ---------------------------- फेरफटका-7485 दैनिक झुंजार नेता 29डिसेंबर2020

-------------------- 

Monday, December 28, 2020

ईडीचे पिलू

आजची वात्रटिका
----------------------------

ईडीचे पिल्लू

ईडीच्या बातम्या ऐकायची,
लोकांना आता गोडी लागली.
सीडी लावायच्या अगोदरच,
त्यांच्या मागे ईडी लागली.

ज्याला ईडी कळली नाही,
तो मात्र आता उल्लू आहे !
कुणाच्याही मागे लागू शकते,
ते ईडीचे पिल्लू आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6014
दैनिक पुण्यनगरी
28डिसेंबर2020
----------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा. माझ्या दैनिक पुण्यनगरीतील 'चिमटा' आणि दैनिक झुंजार नेता तील 'फेरफटका' या सदरातील आणि दैनिक वात्रटिका तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील सतरा हजारांपैकी, सहा हजारांहून जास्त वात्रटिका वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !! https://suryakantdolase.blogspot.com
---------------------------
*विशेष सूचना-* 1)माझ्या वात्रटिकात काही आक्षेपार्ह वाटले तर माझ्या मूळ पोस्ट तपासाव्यात किंवा माझ्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून खात्री करावी.

2)सदरील वात्रटिकांमध्ये काही टायपिंग मिस्टेक असेल तर मला त्वरित कळवा.

3) जे वात्रटिका शेअर करीत आहेत त्यांचे विशेष आभार.

4)आता रोज नव्या बरोबर अनेक जुन्या वात्रटिकांचा खजिना वाचण्यासाठी वाचत रहा *दैनिक वात्रटिका दीपोत्सव2020* डाऊनलोड करा।वाचा।इतरांना शेअर करा।प्रतिक्रिया कळवा https://drive.google.com/.../1yaZylz7.../view... खास वात्रटिकांसाठी वाहिलेले ऑनलाईन दैनिक !!

5) वात्रटिकांविषयी सर्व काही एकाच वेळी...एकाच ठिकाणी !! अर्थात *साप्ताहिक* *सूर्यकांती* खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पाहिले आणि एकमेव ऑनलाईन साप्ताहिक https://weeklysuryakanti.blogspot.com

6)साप्ताहिक सूर्यकांती दीपोत्सव2020 डाऊनलोड लिंक -https://drive.google.com/.../1J.../view...

7) माझ्या  *सूर्यकांती Live* या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या...लाईक करा...*सबस्क्राईब* करा !! https://www.youtube.com/user/suryakantdolase

8) *साप्ताहिक सूर्यकांती* चा ताजा अंक डाऊनलोड लिंक
https://drive.google.com/file/d/1LYN9bi93rjO-5zFt3NBJV2mRc2xoFcDH/view?usp=drivesdk

-सूर्यकांत डोळसे
28डिसेंबर2020

Sunday, December 27, 2020

टीआरपीचा खेळ

आजची वात्रटिका
----------------------------

टीआरपीचा खेळ

टुकार आणि भिक्कार मालिकांना, प्रेक्षकही अगदी चिक्कार आहेत. मालिकांत जेवढा स्वैराचार, प्रेक्षकही तेवढेच मोक्कार आहेत.

चांगल्या मालिकांना मात्र, प्रेक्षकवर्ग धुंडाळावा लागतो ! टीआरपी खरा असो वा खोटा, मालिकांना खेळ गुंडाळावा लागतो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ---------------------------- फेरफटका-7484 दैनिक झुंजार नेता 27डिसेंबर2020-----------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा. माझ्या दैनिक पुण्यनगरीतील 'चिमटा' आणि दैनिक झुंजार नेता तील 'फेरफटका' या सदरातील आणि दैनिक वात्रटिका तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील सतरा हजारांपैकी, सहा हजारांहून जास्त वात्रटिका वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !! https://suryakantdolase.blogspot.com
---------------------------
*विशेष सूचना-* 1)माझ्या वात्रटिकात काही आक्षेपार्ह वाटले तर माझ्या मूळ पोस्ट तपासाव्यात किंवा माझ्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून खात्री करावी.
2)सदरील वात्रटिकांमध्ये काही टायपिंग मिस्टेक असेल तर मला त्वरित कळवा.
3) जे वात्रटिका शेअर करीत आहेत त्यांचे विशेष आभार.
4)आता रोज नव्या बरोबर अनेक जुन्या वात्रटिकांचा खजिना वाचण्यासाठी वाचत रहा *दैनिक वात्रटिका दीपोत्सव2020* डाऊनलोड करा।वाचा।इतरांना शेअर करा।प्रतिक्रिया कळवा https://drive.google.com/.../1yaZylz7.../view... खास वात्रटिकांसाठी वाहिलेले ऑनलाईन दैनिक !!
5) वात्रटिकांविषयी सर्व काही एकाच वेळी...एकाच ठिकाणी !! अर्थात *साप्ताहिक* *सूर्यकांती* खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पाहिले आणि एकमेव ऑनलाईन साप्ताहिक https://weeklysuryakanti.blogspot.com
6)साप्ताहिक सूर्यकांती दीपोत्सव2020 डाऊनलोड लिंक -https://drive.google.com/.../1J.../view...
7) माझ्या *सूर्यकांती Live* या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या...लाईक करा...*सबस्क्राईब* करा !! https://www.youtube.com/user/suryakantdolase
-सूर्यकांत डोळसे
27डिसेंबर2020

दैनिक वात्रटिका l 28मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 298वा l पाने -54

दैनिक वात्रटिका l 28मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 298वा l पाने -54 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1QFQFkgKdfL7eY4viFxy...