Saturday, June 6, 2020

कोरोना माता प्रसन्न

आजची वात्रटिका
------------------------------------
कोरोना माता प्रसन्न
जेवढी भयंकर,तेवढीच रंजक,
कोरोनाच्या साथीची कथा आहे.
कोरोनाच्या निर्मूलनासाठी,
देशात आता 'कोरोना माता' आहे.
काळाप्रमाणे बदलत गेलेली,
परंपरा आणि रूढी आहे !
कोरोना माता म्हणजे,
मरीआईची नवी पिढी आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7306
दैनिक झुंजार नेता
6जून2020

No comments:

दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 306 वा l पाने -57

दैनिक वात्रटिका - मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव दैनिक आजचा अंक  दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 306 वा l पान...