Monday, June 1, 2020

कोरोनामय राजकारण

आजची वात्रटिका
------------------------------------
कोरोनामय राजकारण
राजकारण आणि कोरोनाचा,
एकमेकांचा विळखा आहे.
चंद्रा कार्यकर्त्यांना लोकांपेक्षा,
आपल्या नेत्यांचाच पुळका आहे.
खासदाराकडून आमदारांची,
हजामत नव्हे कटींग आहे.
नेत्यांकडून राजकारणलाच,
जास्तीत जास्त रेटींग आहे.
राजकारण आणि कोरोना,
यांचा चांगला मेळ जमला आहे!
जावयाच्या धमक्या ऐकुन,
सासरा म्हणतो,
हा आमचा घरगुती मामला आहे!!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5815
दैनिक पुण्यनगरी
1जून2020

No comments:

daily vatratika...29jane2026