Friday, June 19, 2020

नाक दाबले की...



आजची वात्रटिका
----------------------------

दारामागचे सत्य

जे पुढच्या दाराने येवू शकतात,
तेच मागच्या दाराने आत असतात.
राज्यसभा आणि विधान परिषद,
त्यामुळेच जीवाला खात असतात.

मागून आत आलेलेच मग,
गुणी,ज्ञानी,कलावंत गणले जातात !
सामाजिक योगदानावाशिवाय का?
ते मागून आत आणले जातात !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7319
दैनिक झुंजार नेता
20जून2020
--------------------------
#कोरोना
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील
आणि साप्ताहिक सूर्यकांती मधील
सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
----------------------------------------
https://suryakantdolase.blogspot.com
विशेष सूचना-माझ्या वात्रटिकात काही आक्षेपार्ह वाटले तर माझ्या मूळ पोस्ट तपासाव्यात किंवा माझ्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून खात्री करावी तसेच एखादी प्रिंट मिस्टेक दिसली तर मला त्वरित कळवा.

-सूर्यकांत डोळसे


No comments:

daily vatratika .26 September 2026