Sunday, June 28, 2020

सलाम गुरुजी सलाम

आजची वात्रटिका
------------------------
सलाम गुरुजी सलाम
टेलर होते,सेलर होते,
सह्याजीराव अन स्वयंपाकी होते.
कोरोनाने गुरुजींना काम लावले,
जे जे अद्याप करायचे बाकी होते.
रेशनवाले झाले,पोलिसमित्र झाले,
आरोग्यसेवकाबरोबर
अजून बरेच काय काय झाले.
दारूपासून किराणा दुकानापर्यंत,
गुरुजी डिलिव्हरी बॉय झाले.
चोवीस तास चेक पोस्टवरसुद्धा,
गुरुर्जीचीच नाकाबंदी होती !
गुरुजी खरे कोरोनायोद्धे शोभले,
कोरोना जणू देशसेवेची संधी होती !!
सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-99238472692
---------------------------------------
चिमटा-5839
दैनिक पुण्यनगरी
25जून2020
-----------------------------
-----------------------
#कोरोना

No comments:

राजकीय व्यंग ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- राजकीय व्यंग  असंगाशीच संग आहे, जो तो सत्तेसाठी दंग आहे.  आजचे राजकारण म्हणजे,  बीभत्स राजकीय व्यं...