Wednesday, June 24, 2020

त्रिवेणी संगम

आजची वात्रटिका
----------------------------
त्रिवेणी संगम
हल्ल्यावर प्रतिहल्ला,
गौप्यस्फोटावर गौप्यस्फोट आहे.
तेवढे सोडून बोला,
सध्या कुणा-कुणाची मोट आहे?
एकमेकांच्या प्रतिमेवर,
एकमेकांचा पोतारा आहे.
जणू कोरोनाच्या टेन्शनवर,
हा राजकीय उतारा आहे ?
चघळा-चघळी चालू आहे,
जणू तोंडात चिंगम आहे !
आपण श्रद्धेने हात जोडू,
हा 'त्रिवेणी संगम' आहे !!
सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-99238472692
----------------------------------------
चिमटा-5838
दैनिक पुण्यनगरी
24जून2020
-------------------------
#कोरोना

No comments:

दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 306 वा l पाने -57

दैनिक वात्रटिका - मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव दैनिक आजचा अंक  दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 306 वा l पान...