Showing posts with label त्रिवेणी संगम. Show all posts
Showing posts with label त्रिवेणी संगम. Show all posts

Thursday, July 23, 2026

त्रिवेणी संगम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------
त्रिवेणी संगम
हौश्या,नवश्या, नवश्यांना,
कॅमेऱ्याची मोठी नशा आहे.
आमच्या इशारा कुणीकडे?
समजेल याची आशा आहे.
हौश्या,नवश्या,नवश्यांना,
गर्दीची बरोबर वर्दी असते.
जिथे मिळते चमकायला संधी,
तिथे त्यांची भाऊगर्दी असते.
हौश्या,नवश्या,नवश्यांकडून,
गर्दीचा आनंद भोगला जातो !
हौश्या,नवश्या,नवश्यामुळे,
बदनामीचा डाग लागला जातो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9346
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
23 जुलै 2026

 

Wednesday, June 24, 2020

त्रिवेणी संगम

आजची वात्रटिका
----------------------------
त्रिवेणी संगम
हल्ल्यावर प्रतिहल्ला,
गौप्यस्फोटावर गौप्यस्फोट आहे.
तेवढे सोडून बोला,
सध्या कुणा-कुणाची मोट आहे?
एकमेकांच्या प्रतिमेवर,
एकमेकांचा पोतारा आहे.
जणू कोरोनाच्या टेन्शनवर,
हा राजकीय उतारा आहे ?
चघळा-चघळी चालू आहे,
जणू तोंडात चिंगम आहे !
आपण श्रद्धेने हात जोडू,
हा 'त्रिवेणी संगम' आहे !!
सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-99238472692
----------------------------------------
चिमटा-5838
दैनिक पुण्यनगरी
24जून2020
-------------------------
#कोरोना

सुपर अल निनो...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- सुपर अल निनो सुपर अल निनोच्या चाहूलीने, वातावरण तापायला लागले. भावी संकटांच्या भीतीमुळे, जग थरथर...