Thursday, June 4, 2020

कोरोना कोचिंग

आजची वात्रटिका
------------------------------------
कोरोना कोचिंग
आपला हात जगन्नाथ,
हे लॉकडाऊनचे ब्रीदवाक्य आहे.
कोरोनाने आत्मविश्वास दिला,
कुणालाही काहीही शक्य आहे.
कोरोनाची ही शिकवण,
अगदी होल अँड सोल आहे !
कोरोनाच्या कोचिंगची फीस,
कित्येकांच्या प्राणांचे मोल आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7304
दैनिक झुंजार नेता
4जून2020

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...