Wednesday, June 3, 2020

परीक्षा आणि निकाल

आजची वात्रटिका
------------------------------------
परीक्षा आणि निकाल
कुणाला वाटते परीक्षा नको,
कुणाला वाटते,घेतलेली बरी आहे.
यंदाचा निकाल म्हणजे,
केजी टू पीजी सरासरी आहे.
परीक्षा आणि परीक्षा,
हे सत्य तर त्रिकाल असेल !
कोरोनाची परीक्षा पास झालो,
हाच सर्वात मोठा निकाल असेल !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5817
दैनिक पुण्यनगरी
3जून2020

No comments:

सहजीवन....आजची वात्रटिका ,दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका ---------------------------- सहजीवन बाबा बुवा आणि राजकारण्यांचा, एकमेकांसाठी दुवा असतो. म्हणूनच नेत्यांच्या आजूबाजूला, कुठला ...