Friday, February 28, 2025

दैनिक वात्रटिका l 28फेब्रुवारी 2025वर्ष- चौथेअंक - 271वा l पाने -51


दैनिक वात्रटिका l 28फेब्रुवारी 2025
वर्ष- चौथे
अंक - 271वा l पाने -51
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि  सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
#मराठीवात्रटिका
#दैनिकवात्रटिका
#नामदेवढसाळ
 

फरार...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

फरार

इकडचा फरार आहे,
तिकडचाही फरार आहे.
लपाछपीच्या खेळाचा,
अलिखित करार आहे.

वराती मागून धावते घोडे,
पाठलागांचा थरार आहे.
थकलेला सूर उमटतो
आरोपी अजून फरार आहे.

यंत्रणा झाली अद्यावत,
तरी सगळे गार गार आहे !
मग निष्कर्ष येतो हाती,
इच्छाशक्तीच ठार आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8843
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
28फेब्रुवारी2025
 

Thursday, February 27, 2025

दैनिक वात्रटिका l 27फेब्रुवारी 2025वर्ष- चौथेअंक - 270वा l पाने -51


दैनिक वात्रटिका l 27फेब्रुवारी 2025
वर्ष- चौथे
अंक - 270वा l पाने -51
अंक डाऊनलोड लिंक  -
https://drive.google.com/file/d/18ho3u30JkgRqBsNBonuclZgYYG4OiQqt/view?usp=drivesdk
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि  सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
#मराठीवात्रटिका
#दैनिकवात्रटिका
#मराठीभाषादिन
#शिवशाही
#कुसुमाग्रजजयंती

 

स्वप्नपूर्ती...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

स्वप्नपूर्ती

जशी बाहेर मराठी आहे,
तशी आत मराठी आहे.
अभिमानाने गातो आम्ही,
अभिजात मराठी आहे.

रडणे कुढणे पुरे झाले,
आनंद तिच्यासाठी आहे.
सर्व बोली गाऊ लागल्या,
अभिजात मराठी आहे.

तनात आहे,मनात आहे
सर्वात मराठी आहे !
श्वासातून आवाज येतो,
अभिजात मराठी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8842
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
27फेब्रुवारी2025
 

Wednesday, February 26, 2025

दैनिक वात्रटिका l 26फेब्रुवारी 2025वर्ष- चौथेअंक - 269वा l पाने -51


दैनिक वात्रटिका l 26फेब्रुवारी 2025
वर्ष- चौथे
अंक - 269वा l पाने -51
अंक डाऊनलोड लिंक  -
https://drive.google.com/file/d/182q7Ac9K1Sx_xt_DrCpDZINohxDn05mm/view?usp=drivesdk
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि  सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
#मराठीवात्रटिका
#दैनिकवात्रटिका
#इतिहास
#ऐतिहासिक_चित्रपट
#छावा

 

इतिहासाचे सादरीकरण...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

इतिहासाचे सादरीकरण

ज्याला जसा पाहिजे तसा,
इतिहास दामटला जातो.
ऐतिहासिक दामटादमटीत,
इतिहास चेमटला जातो.

ज्या पाहिजे त्या रंगात,
इतिहास रंगवला जातो.
कधी अकलेचे तारे तोडून,
इतिहास गुंगवला जातो.

अजेंडा पक्का करूनच,
इतिहास पेश केला जातो !
कोरडा इतिहास ओला करून,
इतिहास कॅश केला जातो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8841
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
26फेब्रुवारी2025
 

Tuesday, February 25, 2025

दैनिक वात्रटिका l 25फेब्रुवारी 2025वर्ष- चौथेअंक - 268वा l पाने -51


दैनिक वात्रटिका l 25फेब्रुवारी 2025
वर्ष- चौथे
अंक - 268वा l पाने -51
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि  सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
#मराठीवात्रटिका
#दैनिकवात्रटिका
#अखिलभारतीयमराठीसाहित्य #संमेलन

 

निष्ठावंत चमचे...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

निष्ठावंत चमचे

चमचे झाले निष्ठावंत,
निष्ठावंत चमचे झाले आहेत.
आजकाल चमच्यांनाच,
चांगले दिवस आले आहेत.

चमचे आणि निष्ठावंत्यांना,
आजकाल चांगला स्कोप आहे.
चमचे आणि निष्ठावंत,
हे एकमेकांचे प्रतिरूप आहे.

निष्ठावंत आणि चमच्यांकडून,
आपल्या निष्ठेचे गोडवे आहेत !
चमचे आणि निष्ठावंत,
लाचार कम कडवे आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8840
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
25फेब्रुवारी2025
 

Monday, February 24, 2025

दैनिक वात्रटिका l 24फेब्रुवारी 2025वर्ष- चौथेअंक - 267वा l पाने -51


दैनिक वात्रटिका l 24फेब्रुवारी 2025
वर्ष- चौथे
अंक - 267वा l पाने -51
अंक डाऊनलोड लिंक  -https://drive.google.com/file/d/16v8DV4UYVlUJ7q62fGBYXMba3Ch-OlKT/view?usp=drivesdk

अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि  सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
#मराठीवात्रटिका
#दैनिकवात्रटिका
#अखिलभारतीयमराठीसाहित्य #संमेलन

 

दांडी गुल ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

दांडी गुल

तमाम भारतीय क्रिकेटवेड्यांची,
इच्छा अखेर फळास आली आहे.
आयआयटीवाल्या बाबा बरोबर,
पाकिस्तानची दांडी गुल झाली आहे.

आपलाच देश जिंकणार....
अशी दोन्हीही देशात एकवाक्यता होती.
यात भविष्य सांगण्यासारखे काय होते?
विजयाची फिफ्टी-फिफ्टी शक्यता होती.

चौकार आणि षटकारासोबतच,
फटका कानमागेही खेचला आहे!
भविष्यवाणी नेहमी बंडल असते,
हा चांगला संदेश सर्वत्र पोचला आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8839
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
24फेब्रुवारी2025
 

Sunday, February 23, 2025

daily vatratika...23feb2025


 

नैतिकतेच्या नावानं..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

नैतिकतेच्या नावानं..

नैतिकतेच्या मुद्द्यावर,
सारेच मूक आणि स्तब्ध आहेत.
राजकारण आणि नैतिकता,
हे जणू विरुद्धार्थी शब्द आहेत.

इतिहासाचे दाखले द्यायचे,
ही गोष्ट ग्राह्य झाली आहे.
राजकारणातून नैतिकता,
केव्हाच कालबाह्य झाली आहे.

नैतिकता कालबाह्य झाली तरी,
तिला पुन्हा पुन्हा उजवले जाते !
नैतिकतेचा उदो उदो करीत,
अनैतिकतेला रुजवले जाते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8838
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
23फेब्रुवारी2025
 

Saturday, February 22, 2025

दैनिक वात्रटिका l 22 फेब्रुवारी 2025वर्ष- चौथेअंक - 265वा l पाने -51


दैनिक वात्रटिका l 22 फेब्रुवारी 2025
वर्ष- चौथे
अंक - 265वा l पाने -51
अंक डाऊनलोड लिंक  -
https://drive.google.com/file/d/14w3KQTMd2AQa5ISy_k6C4rtSEdBR8l7Y/view?usp=drivesdk
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि  सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
#मराठीवात्रटिका
#दैनिकवात्रटिका
#अखिलभारतीयमराठीसाहित्य #संमेलन

 

कॉपीड व्यवस्था....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

कॉपीड व्यवस्था

बारावी एवढा दहावीतही,
कॉपी युक्तीचा पुरावा आहे.
बारावीनंतर दहावीतही,
कॉपीमुक्तीचा तेरावा आहे.

शाळेभोवती खांदले खंदक,
कुठे ड्रोनच्या घिरट्या आहेत.
कुठे कुठे कॉप्या राजरोस,
कुठे कॉप्या भुरट्या आहेत.

ज्याला कॉपी करता येत नाही,
तोच आजकाल स्टुपिड आहे !
कॉपी मुक्तीचा उडाला पज्जा,
सगळी व्यवस्थाच कॉपीड आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8837
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
22फेब्रुवारी2025
 

Friday, February 21, 2025

दैनिक वात्रटिका l 21फेब्रुवारी 2025वर्ष- चौथेअंक - 264वा l पाने -51


दैनिक वात्रटिका l 21फेब्रुवारी 2025
वर्ष- चौथे
अंक - 264वा l पाने -51
अंक डाऊनलोड लिंक  -
https://drive.google.com/file/d/14O3HEC4Tpq6mqns8O98TT72ivzD4ofFa/view?usp=drivesdk
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
#मराठीवात्रटिका
#दैनिकवात्रटिका

 

डुप्लिकेटपणा थांबवा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

डुप्लिकेटपणा थांबवा

काल अवघड वाटणाऱ्या गोष्टी,
आज अचानक सोप्या झाल्या.
ज्याच्या व्हायला नको आहेत,
अशा गोष्टींच्याही कॉप्या झाल्या.

ओरिजनल अशी कुठेच नाही,
सगळीकडेच डुप्लिकेट शैली आहे.
ज्याला कळाले तो म्हणतो,
हे राम तेरी गंगा तो मैली आहे.

स्वतःची शैली जशी आहे,
अगदी शैली तशीच असू द्या !
तुमच्या जागी दुसरे कुणी नको,
लोकांना तुमच्यातले तुम्ही दिसू द्या !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8836
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
21फेब्रुवारी2025
 

Thursday, February 20, 2025

दैनिक वात्रटिका l 20फेब्रुवारी 2025वर्ष- चौथेअंक - 263वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 20फेब्रुवारी 2025
वर्ष- चौथे
अंक - 263वा l पाने -51
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे


 

छावा ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

छावा

विरोधकांची कोल्हेकुई शांत,
एवढे मात्र नक्की आहे,
त्यांनी लावले ' कौशल ' पणाला,
आता नवा चेहरा विक्की आहे.

मालिका काय?चित्रपट काय?
मनोरंजन एके मनोरंजन आहे.
जुन्या प्रतिमेचे नव्या प्रतिमेकडून,
सिनेमॅटिक प्रतिमा भंजन आहे.

ना आमचा कसला आक्षेप,
ना कसला आमचा दावा आहे !
नव्या प्रतिमा आणि प्रतिमानासह,
आपल्यासमोर छावा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8835
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
20फेब्रुवारी2025
 

Wednesday, February 19, 2025

दैनिक वात्रटिका l 19फेब्रुवारी 2025 वर्ष- चौथे अंक - 262वा l पाने -51


दैनिक वात्रटिका l 19फेब्रुवारी 2025
वर्ष- चौथे
अंक - 262वा l पाने -51
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे




 

शिवबा नावाचा विषय...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

शिवबा नावाचा विषय

शिवबा नावाचा महा विषय,
उरणार आणि सरणार नाही.
शिवबा नावाचा विषय वगळता,
महाराष्ट्र महाराष्ट्र उरणार नाही.

शिवबाशिवाय काळोख आहे,
शिवबा महाराष्ट्राची ओळख आहे.
कपाळा-कपाळावर शिवबा,
ठसठशीत आणि ठळक आहे.

शिवबा महाराष्ट्राचा इतिहास,
शिवबा वर्तमान आणि भविष्य आहे !
पारतंत्र्याच्या काळया पानावरचे,
शिवबा स्वराज्य नावाचे भाष्य आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8834
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
19फेब्रुवारी2025
 

Tuesday, February 18, 2025

दैनिक वात्रटिका l 18फेब्रुवारी 2025वर्ष- चौथेअंक - 261वा l पाने -51


दैनिक वात्रटिका l 18फेब्रुवारी 2025
वर्ष- चौथे
अंक - 261वा l पाने -51
अंक डाऊनलोड लिंक  -
https://drive.google.com/file/d/11bt0T7c7bHZ_EzpMELKkdNBql2i4lmHE/view?usp=drivesdk
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे

पक्षांतराचे पैलू...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

पक्षांतराचे पैलू

काही पक्षांतरं भक्तीची आहेत,
काही पक्षांतरं शक्तीची आहेत.
काही पक्षांतरं युक्तीची,
त्याहून जास्त सक्तीची आहेत.

पक्षांतराला एवढे रुळलेत की,
पक्षांतर ही मळवाट झाली आहे.
सर्वात जास्त फायदा म्हणजे,
पक्षांतर ही पळवाट झाली आहे.

कायद्याने जरी बंदी आहे,
तरीही पक्षांतर एक संधी आहे !
कधी तेजी;कधी मंदी,
पक्षांतर म्हणजे अंदाधुंदी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8833
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
18फेब्रुवारी2025
 

Monday, February 17, 2025

दैनिक वात्रटिका l 17फेब्रुवारी 2025वर्ष- चौथेअंक - 260वा l पाने -51



दैनिक वात्रटिका l 17फेब्रुवारी 2025
वर्ष- चौथे
अंक - 260वा l पाने -51
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे

 

नैतिक आणि अनैतिक...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

नैतिक आणि अनैतिक

जे एकासाठी अनैतिक असते,
तेच दुसऱ्यासाठी नैतिक असते.
कुणाला अनैतिकतेचे तर,
कुणाला नैतिकतेचे कौतिक असते.

काळ आणि व्यक्तिसापेक्ष,
नैतिक अनैतिकतेची व्याख्या असते.
काल ज्याची वाटली भीती,
आज त्याच्यावरच ख्या ख्या असते.

जेव्हा जसे वाटतील तसे,
नैतिक अनैतिकतेचे कंगोरे असतात !
आपापल्या सोयीनुसार,
नैतिक अनैतिकतेचे डांगोरे असतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8832
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
17फेब्रुवारी2025
 

Sunday, February 16, 2025

दैनिक वात्रटिका l 16फेब्रुवारी 2025वर्ष- चौथेअंक - 259वा l पाने -51


दैनिक वात्रटिका l 16फेब्रुवारी 2025
वर्ष- चौथे
अंक - 259वा l पाने -51
अंक डाऊनलोड लिंक  -
https://drive.google.com/file/d/108KxhawW5roDOrPylIzj_Sk5hVnfmQ_o/view?usp=drivesdk
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे

तपास चालू आहे ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------
तपास चालू आहे
कालच्यापेक्षा आजचा प्रसंग,
कितीतरी बाका आहे.
लोक लोकांना विचारतात,
कोण कुणाचा आकाआहे?
आकाच्या खाली आका आहे,
आकाच्या वरही आकाआहे.
ज्याला त्याला आपल्या,
घरामधूनच खरा धोका आहे.
आता अक्काबाईचा फेरा नाही,
आता मात्र आकाचा फेरा आहे !
तपास चालू असल्याचा,
चौकशीच्या रकान्यात शेरा आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8831
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
16फेब्रुवारी2025

 

Saturday, February 15, 2025

दैनिक वात्रटिका l 15फेब्रुवारी 2025वर्ष- चौथेअंक - 258वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 15फेब्रुवारी 2025
वर्ष- चौथे
अंक - 258वा l पाने -51
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे


 

गुप्त भेट....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

गुप्त भेट

ते भेटले गुपचूप परस्परांना,
त्यांनी त्यांची चौकशी केली.
ते विचारती एकमेकांना,
सांग बाहेर बातमी कशी गेली?

त्यांनी घेतली गळाभेट की,
नुसते हॅलो अन हाय झाले ?
गावात उठला गदारोळ सारा,
कालच्या आरोपांचे काय झाले?

भेट घडली की घडविली?
कुणाचा नेमका काय रोल होता?
फेब्रुवारी आला मुळावर,
बाहेर व्हॅलेंटाईन डे चा माहोल होता !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8830
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
15फेब्रुवारी2025
 

Friday, February 14, 2025

दैनिक वात्रटिका l 14फेब्रुवारी 2025वर्ष- चौथेअंक - 257वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 14फेब्रुवारी 2025
वर्ष- चौथे
अंक - 257वा l पाने -51
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे


 

रेवडी संस्कृती....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------
रेवडी संस्कृती
अमुक मोफत आहे,
तमूकही मोफत आहे.
फुकटच्या योजनांवर,
आता कोर्टाची आफत आहे.
आपल्या खडखडाटाणे
तिजोरीही कोमात आहे.
आयते खायला सोकलेली
परोपजीवी जमात आहे.
फुकट्या योजनांसाठी
स्पर्धा बघा केवढी आहे?
वाढत्या फुकट्या संस्कृतीची,
कोर्टाकडून रेवडी आहे !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8829
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
14फेब्रुवारी2025
 

Thursday, February 13, 2025

दैनिक वात्रटिका l 13फेब्रुवारी 2025वर्ष- चौथेअंक - 256वा l पाने -51


दैनिक वात्रटिका l 13फेब्रुवारी 2025
वर्ष- चौथे
अंक - 256वा l पाने -51
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
 

कट्टरता आणि गुलामी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

कट्टरता आणि गुलामी

कार्यकर्त्यांच्या कट्टरतेला,
आमचा सलाम आहे.
कार्यकर्ता तेवढा कट्टर,
जेवढा तो गुलाम आहे.

कट्टरता आणि गुलामी,
समानार्थी शब्द आहेत.
याचे पुरावेच पुरावे,
दारा-दारात सिद्ध आहेत.

कट्टरता आणि गुलामीचाही,
अंधत्व हाच पाया आहे !
कट्टर कट्टर कार्यकर्त्यांची,
त्यामुळेच तर दया आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8828
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
13फेब्रुवारी2025
 

Wednesday, February 12, 2025

दैनिक वात्रटिका l 11फेब्रुवारी 2025वर्ष- चौथेअंक - 254वा l पाने -51


दैनिक वात्रटिका l 11फेब्रुवारी 2025
वर्ष- चौथे
अंक - 254वा l पाने -51
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे

बिनलाजेपणाचे धंदे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------
बिनलाजेपणाचे धंदे
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली,
अचकट विचकट बोलले जाते आहे.
हातात सोशल मीडिया असला की,
अक्कल बरोबर पेंड खाते आहे.
सोशल मीडियाच्या सोबतीला,
ओ.टी.टी.प्लॅटफॉर्मचा नंगा नाच आहे.
त्यांच्या मते अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ,
फक्त आणि फक्त अश्लीलता हाच आहे.
अश्लीलतेची एवढी सवय झाली की,
कुणाला त्याशिवाय करमत नाही !
एकदा बिनलाजे जमा झाले की,
मग कुणीच कुणाला वरमत नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8827
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
12फेब्रुवारी2025

 

Tuesday, February 11, 2025

दैनिक वात्रटिका l 11फेब्रुवारी 2025वर्ष- चौथेअंक - 254वा l पाने -51


दैनिक वात्रटिका l 11फेब्रुवारी 2025
वर्ष- चौथे
अंक - 254वा l पाने -51
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे

 

Monday, February 10, 2025

दैनिक वात्रटिका l 10फेब्रुवारी 2025वर्ष- चौथेअंक - 253वा l पाने -51


दैनिक वात्रटिका l 10फेब्रुवारी 2025
वर्ष- चौथे
अंक - 253वा l पाने -51
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे

 

रोखीचा व्यवहार...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

रोखीचा व्यवहार

सगळीकडचे बाजार भाव,
सगळ्यांनाच कळू लागले.
राजकारण आणि धर्मकारणात,
आशीर्वाद विकत मिळू लागले.

विकतच्या आशीर्वादावर,
सगळ्यांचीच दारोमदार आहे.
त्याच्या पदरात काहीच नाही,
ज्याचा व्यवहारच उधार आहे.

विकतच्या आशीर्वादाचा,
परिणामहीअगदी थेट आहे !
राजकारण आणि धर्मकारण,
ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8825
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
10फेब्रुवारी2025
 

Sunday, February 9, 2025

दैनिक वात्रटिका l 9फेब्रुवारी 2025वर्ष- चौथेअंक - 252वा l पाने -51


दैनिक वात्रटिका l 9फेब्रुवारी 2025
वर्ष- चौथे
अंक - 252वा l पाने -51
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे

 
 

दिल्लीची ' सत्ता ' विशी ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

दिल्लीची ' सत्ता ' विशी

हिरोचे झाले झिरो,
झिरोचीही हॅटट्रिक आहे.
'आप'ला पराभव मान्य,
हेसुद्धा एकदम ठीक आहे.

गल्लीपासून दिल्लीपर्यंत,
उधळलेला भाजपाचा वारू आहे.
आपच्या पराभवाचे कारण,
दारू एके दारू आहे.

पराभव काही किरकोळ नाही,
पराभव तसा घाऊक आहे !
करावे तसे भरावे लागले,
राळेगणचा सिद्धी भावूक आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8824
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
9फेब्रुवारी2025 

Saturday, February 8, 2025

दैनिक वात्रटिका l 8फेब्रुवारी 2025वर्ष- चौथेअंक - 251वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 8फेब्रुवारी 2025
वर्ष- चौथे
अंक - 251वा l पाने -51
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे

डबल गेम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

डबल गेम

त्या त्या लाडक्या बहिणी,
सांगा आता कुठे सुखी आहेत?
ज्यांच्या कुणाच्या दारासमोर,
स्वतःच्याच चार चाकी आहेत.

ज्याचे त्याला कळून चुकले,
कुणाचे कुणावर कसले प्रेम आहे?
त्या त्या बहिणींनाही फटका,
ज्यांचा भावांशी 'डबल गेम' आहे.

झाले गेले गंगेला मिळाले,
वसुली ऐवजी हे मात्र ठीक आहे !
तिच्यामध्ये सावत्रभाव जागणारच,
जी कुणी पाच लाखातली एक आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8823
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
8फेब्रुवारी2025
 

Friday, February 7, 2025

दैनिक वात्रटिका l 7फेब्रुवारी 2025वर्ष- चौथेअंक - 250वा l पाने -45


दैनिक वात्रटिका l 7फेब्रुवारी 2025
वर्ष- चौथे
अंक - 250वा l पाने -45
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे

 

'बुम'रँग...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------
'बुम'रँग
कुणाच्या आयुष्यात किती डोकवावे?
चॅनलवाल्यांना भान उरलेले नाही.
इतरांचे उकांडे उचकताना,
स्वतःचे काही स्थान उरलेले नाही.
बाथरूम काय? बेडरूम काय?
अजून कुठे कुठे घुसलेले आहेत?
आपल्याच कॅमेऱ्याने आपले,
चेहरे विद्रुप करीत बसलेले आहेत.
इतरांशी स्पर्धा करता करता,
जणू असंगाशी संग होतो आहे!
आपणच समोर धरलेला बूम,
आपल्या वरतीच बुमरँग होतो आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8822
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
7फेब्रुवारी2025

 

Thursday, February 6, 2025

दैनिक वात्रटिका l 6फेब्रुवारी 2025वर्ष- चौथेअंक - 249वा l पाने -51


दैनिक वात्रटिका l 6फेब्रुवारी 2025
वर्ष- चौथे
अंक - 249वा l पाने -51
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे

 

उपसा आणि सिंचन...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

उपसा आणि सिंचन

कुठे निष्ठेचे सिंचन आहे,
कुठे निष्ठेचा उपसा आहे.
हापस हापस हपसायला,
निष्ठा म्हणजे हापसा आहे.

हापसलेल्या निष्ठेमध्ये,
आतली खदखद वाहू लागली.
एकमेकांची निष्ठा मग,
पाण्यामध्ये पाहू लागली.

राजकीय दुष्काळाला,
सत्तेच्या पाण्याची तहान आहे !
ज्याला पाणी पाजता येते,
तोच सर्वांपेक्षा महान आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8821
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
6फेब्रुवारी2025
 

daily vatratika...29jane2026