Showing posts with label विमानतज्ञ. Show all posts
Showing posts with label विमानतज्ञ. Show all posts

Friday, February 6, 2026

विमानतज्ञ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------
विमानतज्ञ
ज्याला ज्याला बोलता येईल,
ते वाटेल ते बोलू लागले.
त्यांच्या अंदाजाचे विमान,
डोक्यात घिरट्या घालू लागले.
बोलणारे जसे अज्ञ आहेत,
बोलणारे तसे सुज्ञ आहेत.
जिकडे बघावे तिकडे,
हल्ली सर्वच विमानतज्ञ आहेत.
ज्याला जसे वाटते आहे,
तसे त्याचे नवे विधान आहे !
कुणाकडून तर जाणीवपूर्वक,
शंका कुशंकांना उधाण आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9182
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
6 फेब्रुवारी 2026
 

daily vatratika.. 24Sept2026