समोर एक, मागे एक
बोलण्याचे धंदे असतात.
पोपटी विचारवंत
सत्ताधार्यांचे मिंधे असतात.
त्यांनी मांडलेले विचार म्हणजे
बाष्कळ पोपटपंची असते!
पुरस्कार आणि पदांएवढीच
त्यांची वैचारिक उंची असते!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Monday, January 9, 2012
Sunday, January 8, 2012
सारे काही तिकिटासाठी..
इकडे घुसू की तिकडे घुसू?
दोन्ही-तिन्ही दगडीवर हात आहे.
पक्ष कोणताही असला तरी
तिकीट मिळण्याशी बात आहे.
शेवटी तिकीट महत्त्वाचे
पक्ष-बिक्ष सबकुछ झूठ आहे!
उघडी कशाला करायची?
ही तर झाकलेली मूठ आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
दोन्ही-तिन्ही दगडीवर हात आहे.
पक्ष कोणताही असला तरी
तिकीट मिळण्याशी बात आहे.
शेवटी तिकीट महत्त्वाचे
पक्ष-बिक्ष सबकुछ झूठ आहे!
उघडी कशाला करायची?
ही तर झाकलेली मूठ आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Saturday, January 7, 2012
बंडाची लाट
आवरता येत नाही
राजकीय कंडाला.
सर्वत्र सुरुवात झाली
पक्षीय बंडाला.
कंडोबाशी बंडोबाचे
जन्मजात नाते असते!
जुन्याच राजकीय वहीवर
स्वतंत्र खाते असते!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
राजकीय कंडाला.
सर्वत्र सुरुवात झाली
पक्षीय बंडाला.
कंडोबाशी बंडोबाचे
जन्मजात नाते असते!
जुन्याच राजकीय वहीवर
स्वतंत्र खाते असते!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Sunday, January 1, 2012
नववर्षाचे स्वागत
नववर्षाच्या स्वागताची
ज्याची त्याची रित असते.
ते ते सोबतीला लागते
ज्याच्यावरती प्रीत असते.
कसे साजरे करू? कसे नाही?
असेच सर्वाना झालेले असते!
शुद्धीवर येतात तेव्हा
नवीन वर्षही आलेले असते!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
ज्याची त्याची रित असते.
ते ते सोबतीला लागते
ज्याच्यावरती प्रीत असते.
कसे साजरे करू? कसे नाही?
असेच सर्वाना झालेले असते!
शुद्धीवर येतात तेव्हा
नवीन वर्षही आलेले असते!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Saturday, December 31, 2011
लोकपाल भूमिका
कुणाला हवे, कुणाला नको,
कुणाचा तोंडावरती हात आहे.
दुरून मज्जा बघणारांमुळेच
घोडे पेंड खात आहे.
कोणती तरी भूमिका घ्या
भूमिकेला कुठे मना आहे?
ज्याला तटस्थपणा समजता
तो तर भित्रेपणा आहे!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
कुणाचा तोंडावरती हात आहे.
दुरून मज्जा बघणारांमुळेच
घोडे पेंड खात आहे.
कोणती तरी भूमिका घ्या
भूमिकेला कुठे मना आहे?
ज्याला तटस्थपणा समजता
तो तर भित्रेपणा आहे!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
भ्रमनिरास
हे म्हणतात, त्यांनी येऊ दिले नाही
ते म्हणतात, यांनी येऊ दिले नाही.
येणार येणार म्हणता म्हणता
लोकपाल काही आले नाही.
आमच्या भाबडय़ा आशेचा
राज्यसभेत चक्काचूर झाला !
हे बुद्धिवंतांचे सभागृह आहे
आमचा ग्रह दूर झाला !!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
ते म्हणतात, यांनी येऊ दिले नाही.
येणार येणार म्हणता म्हणता
लोकपाल काही आले नाही.
आमच्या भाबडय़ा आशेचा
राज्यसभेत चक्काचूर झाला !
हे बुद्धिवंतांचे सभागृह आहे
आमचा ग्रह दूर झाला !!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Wednesday, December 28, 2011
रास्त अपेक्षा
कुणाला सशक्त वाटले,
कुणाला अशक्त वाटले.
लोकपाल पाहिजे म्हणता म्हणता
अण्णांचे रक्त आटले.
लोकशाहीचे पाविर्त्य जपा
अजून कुणाचे रक्त आटवू नका!
संविधानाची शपथ आहे
संसदेला पुन्हा बाटवू नका!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
कुणाला अशक्त वाटले.
लोकपाल पाहिजे म्हणता म्हणता
अण्णांचे रक्त आटले.
लोकशाहीचे पाविर्त्य जपा
अजून कुणाचे रक्त आटवू नका!
संविधानाची शपथ आहे
संसदेला पुन्हा बाटवू नका!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Tuesday, December 27, 2011
पुतण्यांचे बंड
काका कोणताही असो
त्याच्यावर प्रसंगच बाका आहे.
काकाला पुतण्यापासून
अगदी हमखास धोका आहे.
हातच्या काकणाला
आरसा कशाला पाहिजे?
पुतणे विचारू लागले,
मुलगा आणि मुलगीकडेच
वारसा कशाला पाहिजे?
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा(बीड)
त्याच्यावर प्रसंगच बाका आहे.
काकाला पुतण्यापासून
अगदी हमखास धोका आहे.
हातच्या काकणाला
आरसा कशाला पाहिजे?
पुतणे विचारू लागले,
मुलगा आणि मुलगीकडेच
वारसा कशाला पाहिजे?
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा(बीड)
वरळी ते परळी
तिकडे काका आडवे होते,
इकडेही काका आडवे आहेत.
तिकडेही भोवती बडवे होते
इकडेही भोवती बडवे आहेत.
तिकडे बडव्यांविरुद्ध बंड होते,
इकडेही बडव्यांविरुद्ध बंड आहे!
परळी काय? वरळी काय?
एकच राजकीय पिंड आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
इकडेही काका आडवे आहेत.
तिकडेही भोवती बडवे होते
इकडेही भोवती बडवे आहेत.
तिकडे बडव्यांविरुद्ध बंड होते,
इकडेही बडव्यांविरुद्ध बंड आहे!
परळी काय? वरळी काय?
एकच राजकीय पिंड आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Sunday, December 25, 2011
तिची ओळख
अमक्याची पत्नी, तमक्याची आई,
एवढीच तिची ओळख आहे.
महिला आरक्षणाच्या नावाने
अजून तरी काळोख आहे.
आरक्षणाच्या खेळामध्ये
तिला प्यादी म्हणून खेळवले जाते!
पुरुषी वर्चस्वाचे समाधान
लोकशाही मार्गानेही मिळवले जाते!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
एवढीच तिची ओळख आहे.
महिला आरक्षणाच्या नावाने
अजून तरी काळोख आहे.
आरक्षणाच्या खेळामध्ये
तिला प्यादी म्हणून खेळवले जाते!
पुरुषी वर्चस्वाचे समाधान
लोकशाही मार्गानेही मिळवले जाते!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
राजकीय उदारीकरण
चांगली ऑफर असेल तर
मुळीच टाळली जात नाही.
पक्षीय स्पृश्य-अस्पृश्यता
मुळीच पाळली जात नाही.
नव्या पिढीचे, नव्या घडीचे
हेच तर धोरण आहे!
नव्या राजकीय परिभाषेनुसार
हे राजकीय उदारीकरण आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मुळीच टाळली जात नाही.
पक्षीय स्पृश्य-अस्पृश्यता
मुळीच पाळली जात नाही.
नव्या पिढीचे, नव्या घडीचे
हेच तर धोरण आहे!
नव्या राजकीय परिभाषेनुसार
हे राजकीय उदारीकरण आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Saturday, December 24, 2011
लोकपालची चाहूल
लोकशाहीचे मारेकरी
थरथर कापायला लागले.
लोकपालाच्या चाहुलीनेच
लोकशाही जपायला लागले
लोकपाल विधेयकापासून
भ्रष्टाचार्यांचा पळ आहे!
हा लोकशाहीचा कळवळा नाही,
केलेल्या पापाचे फळ आहे!!-
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
थरथर कापायला लागले.
लोकपालाच्या चाहुलीनेच
लोकशाही जपायला लागले
लोकपाल विधेयकापासून
भ्रष्टाचार्यांचा पळ आहे!
हा लोकशाहीचा कळवळा नाही,
केलेल्या पापाचे फळ आहे!!-
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Friday, December 23, 2011
भारतरत्नाची दक्षता
भारत रत्नाच्या नियमावलीत
काहीही घुसवणे बरे नाही.
कुणाच्याही रांगेत
कुणालाही बसवणे बरे नाही.
भारतरत्नाची खिरापत
जर कुणालाही वाटली जाईल!
तर पूर्वीच्या भारतरत्नाची
किंमत नक्की घटली जाईल!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
काहीही घुसवणे बरे नाही.
कुणाच्याही रांगेत
कुणालाही बसवणे बरे नाही.
भारतरत्नाची खिरापत
जर कुणालाही वाटली जाईल!
तर पूर्वीच्या भारतरत्नाची
किंमत नक्की घटली जाईल!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
आशावाद
कुणी झाले शरमिंदे,
कुणी रागाने लाल झाले.
हो...नाही...म्हणता म्हणता
अखेर लोकपाल आले.
कुठे माशी घोटाळेल,
कुठे माशी शिंकली जाईल !
रस्त्यावरची लढाई मात्र
संसदेतच जिंकली जाईल !!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
कुणी रागाने लाल झाले.
हो...नाही...म्हणता म्हणता
अखेर लोकपाल आले.
कुठे माशी घोटाळेल,
कुठे माशी शिंकली जाईल !
रस्त्यावरची लढाई मात्र
संसदेतच जिंकली जाईल !!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
आधुनिक महाभारत
गोंधळून जायचा प्रसंग
गोपीनाथांवर बेतला आहे.
धनंजयाने तर म्हणे
झोपेत दगड घातला आहे.
कौटुंबिक महाभारत
रंगता रंगता रंगले आहे!
कुणी कुणाला गीता सांगायची?!!
न सांगितलेलेच चांगले आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
गोपीनाथांवर बेतला आहे.
धनंजयाने तर म्हणे
झोपेत दगड घातला आहे.
कौटुंबिक महाभारत
रंगता रंगता रंगले आहे!
कुणी कुणाला गीता सांगायची?!!
न सांगितलेलेच चांगले आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Wednesday, December 21, 2011
'राज'कीय भूमिका
सीमावासीय राहिले बाजूला
मनसेच स्टार झाली.
'आहे तिथेच सुखाने राहा'
याचीच चर्चा फार झाली.
उपहास की उपरोध?
की हे शाब्दिक व्यंग आहे?
हीच राजकीय भूमिका असेल तर
हा अस्मितेचा मान भंग आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मनसेच स्टार झाली.
'आहे तिथेच सुखाने राहा'
याचीच चर्चा फार झाली.
उपहास की उपरोध?
की हे शाब्दिक व्यंग आहे?
हीच राजकीय भूमिका असेल तर
हा अस्मितेचा मान भंग आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Tuesday, December 20, 2011
संमेलनाध्यक्ष निवड
कुणाला वाटले तर वाटू द्या
आमचे नेहमीच वाकडय़ात आहे
पण बारा कोटीच्या मराठीची
मतदार संख्या शेकडय़ात आहे
शेकडय़ांनी निवडलेला
कोटीवरती लादला जातो
घाणेरडे राजकारण करून
डाव बरोबर साधला जातो
प्रक्रिया सुधारली पाहीजे
निवडणूकीनंतरच बोलले जाते!
अध्यक्षपद पटकावले की,
तोंड बरोबर खोलले जाते!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
आमचे नेहमीच वाकडय़ात आहे
पण बारा कोटीच्या मराठीची
मतदार संख्या शेकडय़ात आहे
शेकडय़ांनी निवडलेला
कोटीवरती लादला जातो
घाणेरडे राजकारण करून
डाव बरोबर साधला जातो
प्रक्रिया सुधारली पाहीजे
निवडणूकीनंतरच बोलले जाते!
अध्यक्षपद पटकावले की,
तोंड बरोबर खोलले जाते!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
घोडे आणि बाजार
कुणी करतो जुळवाजळव,
कुणी नोटा मोजित असतो
सत्तास्थापनेच्या मुहूर्ताला
घोडेबाजार तेजीत असतो
घोडे जेवढे उधळतील
तेवढा माल द्यावा लागतो!
राजकीय रस्सीखेच अशी की,
नालीसाठीही घोडा घ्यावा लागतो!!-
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
कुणी नोटा मोजित असतो
सत्तास्थापनेच्या मुहूर्ताला
घोडेबाजार तेजीत असतो
घोडे जेवढे उधळतील
तेवढा माल द्यावा लागतो!
राजकीय रस्सीखेच अशी की,
नालीसाठीही घोडा घ्यावा लागतो!!-
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Friday, December 2, 2011
खड्डय़ांची 'डाग'डुजी
डांबरटपणा करून
रस्त्यांना सजवू लागले.
विचारल्यानंतर कळाले,
खड्डय़ांना बुजवू लागले.
खड्डे बुजले नाहीत
खड्डे केवळ झाकले आहेत!
आधीच बरबटलेले हात
पुन्हा नव्याने माखले आहेत!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
रस्त्यांना सजवू लागले.
विचारल्यानंतर कळाले,
खड्डय़ांना बुजवू लागले.
खड्डे बुजले नाहीत
खड्डे केवळ झाकले आहेत!
आधीच बरबटलेले हात
पुन्हा नव्याने माखले आहेत!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
बंडखोरीचा अर्थ
आपल्या आणि परक्या बंडखोरांना
वेगवेगळा न्याय असतो.
पक्षीय बंडखोरीचा अर्थ
वेगवेगळा नाहीतर काय असतो?
दुसर्यासाठी पायघडय़ा घालतात,
आपल्यावरती शिस्तभंग असतो!
पक्षीय बंडखोरीला,
असा आवडीचा रंग असतो!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
वेगवेगळा न्याय असतो.
पक्षीय बंडखोरीचा अर्थ
वेगवेगळा नाहीतर काय असतो?
दुसर्यासाठी पायघडय़ा घालतात,
आपल्यावरती शिस्तभंग असतो!
पक्षीय बंडखोरीला,
असा आवडीचा रंग असतो!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Tuesday, November 29, 2011
गांधीवादाची नवी व्याख्या
गांधीवादाची नवी व्याख्या
बारामतीला लागली थप्पड
दिल्लीत तिचा आवाज आला.
उथळ प्रतिक्रिया देत सुटणे
हा राळेगणचा रिवाज झाला.
अण्णांची उपहासात्मक प्रतिक्रिया
सारवासारवीनंतरही दुष्ट झाली!
गांधीवादाची नवी व्याख्या
संदर्भासहित स्पष्ट झाली!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
बारामतीला लागली थप्पड
दिल्लीत तिचा आवाज आला.
उथळ प्रतिक्रिया देत सुटणे
हा राळेगणचा रिवाज झाला.
अण्णांची उपहासात्मक प्रतिक्रिया
सारवासारवीनंतरही दुष्ट झाली!
गांधीवादाची नवी व्याख्या
संदर्भासहित स्पष्ट झाली!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
भांडवली धोरण
भांडवली धोरण
भांडवलासाठी मुद्दा पाहिजे
शेतकर्यांचे कुणाला पडले आहे?
शेतकर्यांसाठी लढावे म्हणून
कुठे कुणाचे घोडे अडले आहे?
ते स्वत:साठी लढत आहेत,
शेतकर्यांसाठी लढत नाहीत!
सत्तेवर कुणीही असोत
शेतकर्यांना पिळायचे सोडत नाहीत!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
भांडवलासाठी मुद्दा पाहिजे
शेतकर्यांचे कुणाला पडले आहे?
शेतकर्यांसाठी लढावे म्हणून
कुठे कुणाचे घोडे अडले आहे?
ते स्वत:साठी लढत आहेत,
शेतकर्यांसाठी लढत नाहीत!
सत्तेवर कुणीही असोत
शेतकर्यांना पिळायचे सोडत नाहीत!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Subscribe to:
Posts (Atom)
दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51
दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...
-
आजची वात्रटिका ------------------------- सुज्ञास सांगणे न लगे... वाट्टेल त्याला;वाट्टेल तसे, गुळाचे गणपती पावायला लागले. उरले सुरले भक्तही म...