Saturday, December 4, 2021

घाला मास्क,वागा नीट... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------
घाला मास्क,वागा नीट
डबल लस,डबल मास्क,
ओमायक्रॉनचा उतारा आहे.
कारोनाच्या अनुभवीपणावर,
कोरोनाचाच पोतारा आहे.
कोरोनाच्या अस्तित्वावर,
उगीच पोतारे फिरवू नका!
डबल डोसवाल्यांनो,
उजळ नाकाने मिरवू नका !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7776
दैनिक झुंजार नेता
4डिसेंबर2021




साहित्याचा 'कौतुक' सोहळा... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

साहित्याचा 'कौतुक' सोहळा

नाशिकस्थळी सिद्ध झाले,
संमेलन अध्यक्षलेस होवू शकते.
उद्या अध्यक्षीय पात्रताही,
फिजिकल फिटनेस होवू शकते.

तब्येत आणि कोरोनाचे कारण,
तसे पाहता लॉजिकल हीट होते !
तेही अक्करमाशे ठरविले गेले,
जे म्हणे फिजिकल फिट होते!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6341
दैनिक पुण्यनगरी
4डिसेंबर2021

 

Friday, December 3, 2021

ऋतूंचे कॉकटेल....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

ऋतूंचे कॉकटेल

आपल्या हाताने आपली,
निसर्गाकडून छी थू आहे.
ऋतूंचे झाले कॉकटेल,
कळेना कोणता ऋतू आहे?

निसर्गाचे बिघडले चक्र,
सगळी उलटापालट आहे.
निसर्ग नियमांच्याच,
सगळे उलट सुलट आहे.

माणसावर निसर्गाचा नाही,
निसर्गावर माणसाचा पगडा आहे!
बेईमान झाले सगळे ऋतू,
त्यांचा अस्तित्वासाठी झगडा आहे!!


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------
फेरफटका-7775
दैनिक झुंजार नेता
3डिसेंबर2021

 

छापील सत्य...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------
छापील सत्य
साहित्य संमेलनाला,
नेहमीच वादाची बाधा असते.
संमेलनावर राजकारण,
नेहमीप्रमाणेच फिदा असते.
साहित्य आणि राजकारण,
एकमेकांना पूरक आहे.
याला गाळा, त्याला टाळा,
याचे राजकारण कारक आहे.
साहित्यापेक्षा राजकारण,
हेच आमंत्रणाचे मोजमाप असते!
कोणत्या न कोणत्या पक्षाचे,
साहित्य संमेलनावर छाप असते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6340
दैनिक पुण्यनगरी
3डिसेंबर2021

 

Thursday, December 2, 2021

मार्गदर्शक सूचना...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

मार्गदर्शक सूचना

रचना वर रचना,
कोरोनाच्या रचना आहेत.
सूचना वर सूचना,
मार्गदर्शक सूचना आहेत.

सोंग फार असली तरी,
रात्री फार थोड्या आहेत!
कोरोनाच्या नावाखाली,
एकमेकांवर कुरघोड्या आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-7774
दैनिक झुंजार नेता
2डिसेंबर2021

 

गवताला भाले फुटले...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

गवताला भाले फुटले

कुणाचा झाला हिरमोड,
कुणाची वाढली एनर्जी.
तळागाळात गेले पाहिजे,
ममताने फडकवले बॅनर जी.

त्यांची ममतापूर्वक घोषणा,
जय मराठा,जय बांगला आहे !
मानापमानाचा खेळ,
महाराष्ट्रात रंगला आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6339
दैनिक पुण्यनगरी
2डिसेंबर2021

 

Wednesday, December 1, 2021

इथे पाहिजे जातीचे !...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

इथे पाहिजे जातीचे !

तुम्हाला जातीपाती पाळायच्या तर,
तुम्ही जातीपाती खुशाल पाळा.
तुमच्या जाती-पाती पालनाचे,
ओंगळवाणे प्रदर्शन तरी टाळा.

इथे पाहिजे जातीचे,
यामागे तुमची वेगळीच गोम आहे!
कुणाला तरी छोटे ठरविण्यासाठी,
तुमचे जाती-पातीचे स्तोम आहे.

वळवळत्या जातीय किड्यांची,
तुम्हाला अहंकारी साथ आहे!
हे लक्षात ठेवा जात कर्तृत्त्व नाही,
जात जन्मत:च एक अपघात आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7774
दैनिक झुंजार नेता
1डिसेंबर2021

 

ओ...माय... क्रॉन !...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------
ओ...माय... क्रॉन !
ओमिक्रॉनचा घातक विषाणू,
आपली चाल विसरू लागला.
हवेतून पसरण्याऐवजी,
इथे मीडियातून पसरू लागला.
आपली आगाऊ पूर्वतयारीही,
ओमिक्रॉनचा पर्यंत पोचली आहे!
आपण व्यक्ती मृत पावल्यानंतरही,
त्याला सर्टिफाइड लस टोचली आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6338
दैनिक पुण्यनगरी
1डिसेंबर2021

 

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...