Wednesday, January 11, 2023

उपटसुंभ...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

उपटसुंभ

इकडेही उपटसुंभ आहे,
तिकडेही उपटसुंभ आहे.
जिकडे बघावे तिकडे,
सर्वत्र सारखीच बोंब आहे.

ते आपला खुटा उपटतात,
आपण त्यांना निपटू शकत नाही.
उपटसुंभांचा गोड गैरसमज,
कुणी काहीच उपटू शकत नाही.

आपण उपटसूळ असल्यानेच,
आपण उपटसुंभ सोसले आहेत!
दर पाच वर्षाला होते चूक,
त्यामुळेच उपटसुंभ पोसले आहेत!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8146
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
11जानेवारी2023
 

षंढांचे षडयंत्र...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

षंढांचे षडयंत्र

तुम्ही नडलात,तुम्ही भिडालात,
ते बदनामीचा शह देवू शकतात.
तरीही तुम्ही पुरून उरलात तर,
मग कट-कारस्थानं होवू शकतात.

ते कसले बोडख्याचे चतुर?
ते काटा काढायला आतूर असतात.
त्यांचे हस्तक आणि मस्तक,
आपलेच जळके फितूर असतात.

ते उथळ असले तरी,
त्यांचे विषय मात्र खूप खोल आहेत!
आमच्यासारखे अनुभवी सांगतील,
हे तर अनुभवाचेच बोल आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6688
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
11जानेवारी2023
 

Tuesday, January 10, 2023

सत्तेचे कोर्ट मॅटर...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------
सत्तेचे कोर्ट मॅटर
जनतेच्या कोर्टातून खऱ्या कोर्टात,
सत्तेचा संघर्ष जाम अडकला आहे.
तारीख पे तारीख होत असल्याने,
सत्ता संघर्ष पुन्हा भडकला आहे.
नको ते दळण दळून दळून,
लोकमताचे भुस्काट पडले आहे!
सत्ता संघर्ष न्यायप्रविष्ट असल्याने,
सगळ्यांचेच मुस्काट पडले आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8145
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
10जानेवारी2023

 

थंडीची नशा...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

थंडीची नशा

नाका तोंडात वारा असतो,
घसरलेला पारा असतो.
आला थंडीचा महिना sss
गारठवणारा नारा असतो.

कुठे थंडी भाजली जाते,
कुठे थंडी शिजली जाते.
ज्याचा होतो निरुपाय,
त्यालाच थंडी वाजली जाते.

कपामुळे वाफाळते बशी,
बाटलीला बाटली भिडली जाते !
आगीने आग वाढत जाऊन,
थंडीलाही नशा चढली जाते!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6687
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
10जानेवारी2023
 

Monday, January 9, 2023

चित्रा विरुद्ध रूपाली...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

चित्रा विरुद्ध रूपाली

उर्फीचे अंगप्रदर्शन बघून,
ऊर फोडून घेवू लागल्या.
उर्फी राहिली बाजूला,
ह्याच लढून घेवू लागल्या.

काय घालावे?काय बोलावे?
हा व्यक्तिगत मामला आहे!
ओंगळवाने प्रदर्शन बघून,
महाराष्ट्र पुरता दमला आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8144
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
9जानेवारी2023
 

विस्ताराचा गुळणा...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

विस्ताराचा गुळणा

बंडखोरांच्या तोंडातून फुटलेला,
मंत्रिमंडळ विस्ताराचा गुळणा आहे.
एक दिलाने,एक सुराने,
मंत्रिमंडळ विस्ताराचा पाळणा आहे.

विस्ताराच्या पाळण्याची दोरी,
सर्वच बंडखोरांना खूप जाचत आहे !
कुणाचा चालला थयथयाट,
कुणी मनातल्या मनात नाचत आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6686
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
9जानेवारी2023
 

Sunday, January 8, 2023

सैनिकी वाटचाल...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

सैनिकी वाटचाल

या गटातून त्या गटात,
सैनिकांचे स्थलांतर आहे.
उघड सांगायचे तर,
हे सेनेचे बलांतर आहे.

स्थलांतर ते बलांतर,
अशी सेनेची वाताहत आहे!
एक नाथी,एक हाती,
आता सेनेची पत आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8143
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
8जानेवारी2023
 

गुंडास महागुंड...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

गुंडास महागुंड

कुणी म्हणे गुंड आहे,
कुणी म्हणे महागुंड आहे.
लोकांना ते षंढ मानतात,
कारण जनता महाथंड आहे.

जशी गुंडागर्दीची नशा आहे,
तशी गर्मी आणि गुर्मी आहे !
गुंडात आणि महागुंडात,
सगळेच समानधर्मी आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6685
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
8जानेवारी2023
 

Saturday, January 7, 2023

गांडूळांनो....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

गांडूळांनो....

तुमच्या बुळंगेपणामुळेच,
कपटी लोकांचे पावले जाते.
जसे मासे पकडण्यासाठी,
गाडूळांना गळाला लावले जाते.

डोळ्यांचा तर पत्ता नाही,
कपाळी दुतोंडीपणाचा शाप आहे!
गांडूळांनो तुमचा गांडूळपणा,
तुमच्या लायकीचे माप आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8142
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
7जानेवारी2023
 

नंगानाच...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

नंगानाच

कुणाचे खाणे,पिणे,गाणे,
कुणाचे लफडे,कपडे जाचू लागले.
व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली,
कुणी कुणी तर नागवे नाचू लागले.

कुणाच्या धर्मावर,कुणाच्या कर्मावर,
कुणाच्या वर्मावरती घाव आहे.
या सगळ्याच थयथयाटाला,
फक्त नंगानाच हेच एक नाव आहे.

कुणाला गोत्यात कसे आणावे?
याकडेच प्रत्येकाचे डोळे आहेत !
जे परस्परांसमोर नाक खाजवतात,
त्या सर्वांचे हे माकडचाळे आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6684
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
7जानेवारी2023
 

Friday, January 6, 2023

बेजबाबदारीचा गुत्ता...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

बेजबाबदारीचा गुत्ता

हल्ली जबाबदारांनाच,
बेजबाबदार म्हटले जाते.
बेजबाबदारीचा कळस बघून,
आपले डोके उठले जाते.

जणू त्यांच्याकडेच,
बेजबाबदारीचा गुत्ता असतो!
आपले डोके उठले तरी,
त्यांना डोक्याचा पत्ता नसतो!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8141
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
6जानेवारी2023
 

मोबाईल जर्नलिझम...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

मोबाईल जर्नलिझम

नैतिकता,विश्वासार्हता वगैरे वगैरे,
सगळीच्या सगळी बंधने सैल झाली.
सोशल मीडियाच्या माध्यमातून,
बंदिस्त पत्रकारिता मोबाईल झाली.

सिटीझन्स झाले नेटिझन्स,
फारसे कुणी वेटिझन्स उरले नाहीत.
फाईव्ह जी आ वासून उभे,
तरी काळाची पावले हेरले नाहीत.

ओल्ड इस गोल्ड असले तरी,
ते आता फारसे सोल्ड होत नाही!
जो काळाचे अमृत प्याला,
फक्त तोच कधी ओल्ड होत नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6683
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
6जानेवारी2023
 

Thursday, January 5, 2023

नासका आनंद...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

नासका आनंद

एक नासका आंबा अढी नासवतो,
हा दावा शंभर टक्के फुसका आहे.
अढी नासते याचे खरे कारण,
प्रत्येक आंबा आतून नासका आहे.

नासक्याला नासके भेटतात,
तेंव्हाच अढीची खरी वाट लागते !
नासक्यांना मिळतो नासका आनंद,
इतरांच्या खिशाला चाट लागते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8140
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
5जानेवारी2023
 

नॉनस्टॉप प्रोग्राम...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

नॉनस्टॉप प्रोग्राम

बारा महिने तेरा त्रिकाळ,
राजीनाम्याच्या मागण्या असतात.
बारा महिने तेरा त्रिकाळ,
तापलेल्या डागण्या असतात.

राजीनामा मागणीच्या डागणीने,
सतत राजकारण तापवले जाते!
एकदा साटेलोटे झाले की,
त्यांना जे वाटेल ते खपवले जाते!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6682
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
5जानेवारी2023
 

Wednesday, January 4, 2023

भाषणबाजी...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

भाषणबाजी

बोलता आले म्हणजे,
पेलता येतेच असे नाही.
कोलता आले म्हणजे,
तोलता येतेच असे नाही.

कुणासाठी भाषणबाजी,
टाळ्या आणि हश्या आहे,
कुणासाठी भाषणबाजी,
छंद नाहीतर पेशा आहे.

बोलण्यात ओलावा असावा,
उगीच आपले कोरडे नकोत!
बोला,चाला आणि पेला,
उगीच आपले ओरडे नकोत!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8139
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
4जानेवारी2023
 

प्रतिमा निर्मिती....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

प्रतिमा निर्मिती

ऐतिहासिक प्रतिमा,
उलट्या सुलट्या करू लागले.
कुणी लागले डरंगळायला,
कुणी उलट्या करू लागले.

ऐतिहासिक प्रतिमांना,
आपल्या सोयीचे अर्थ आहेत.
प्रतिमा निर्मितीही तशीच,
जसे आपले आपले स्वार्थ आहेत.

याचा अर्थ मात्र असा नाही,
सर्वच्या सर्व प्रतिमा खऱ्या आहेत!
तरीही आपलीच पंचायत नको,
जरी आपल्याच मोऱ्या आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6681
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
4जानेवारी2023
 

Tuesday, January 3, 2023

खुर्चीवीरांचे प्रताप...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

खुर्चीवीरांचे प्रताप

आपल्या मनातली गरळ,
खुर्चीवीर ओकायला लागले.
ऐतिहासिक उपाध्यांनी,
इतिहास ठोकायला लागले.

श्रद्धा आणि सबुरी राखायला,
त्यांच्याकडे कुठे धीर आहे?
खुर्चीवीरांच्या तोंडामध्ये,
कसला कसला वीर आहे.

शाब्दिक जाळ्यामध्ये,
एकमेकांना गाठायला लागले!
एकजात सगळेच खुर्चीवीर,
वाटेल तसे सुटायला लागले!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8138
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
3जानेवारी2023
 

सावित्रीची आण...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

सावित्रीची आण

तुला मान आहे, पान आहे,
सगळे कसे छान छान आहे.
म्हणूनच गं आई..बाई..
तुला आई सावित्रीची आण आहे.

तुला वास्तवाचे भान आहे,
तुला वास्तवाची जाण आहे.
चुकून विसरली,चुकून घसरली,
तुला आई सावित्रीची आण आहे.

ओठात हवी,पोटात हवी,
याचे तुला आत्मभान आहे.
सावित्री रुजव,सावित्री जोजव,
तुला आई सावित्रीची आण आहे.

अबबलेची तू सबला झालीस,
शक्ती आणि मुक्तीचे वाण आहे.
सावित्रीचा वारसा आरसा हो,
तुला आई सावित्रीची आण आहे.

भूत वेगळे,भविष्य वेगळे,
हातात तुझ्या वर्तमान आहे !
सावित्री घडव, सावित्री मढव,
तुला आई सावित्रीची आण आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6680
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
3जानेवारी2023
 

Monday, January 2, 2023

धोक्याचा इशारा...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

धोक्याचा इशारा

बाळा,स्वागताला भुलू नकोस,
स्वागताची कारणे समजून घ्यावीस.
अनुभवाचे बोल सांगत,
2023 ला म्हणाले 2022.

पिण्याने होते स्वागत,
पिण्यानेच निरोप दिला जातो.
मागच्या वर्षातून पुढच्या वर्षी,
संकल्पांचा कागद नेला जातो.

येताना खुशीत आलास,
जाताना जीव कासावीस होईल!
बाळा हे कालचक्र आहे,
विचार करेपर्यंत 2024 येईल!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8137
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
2जानेवारी2023
 

बंडखोरीचे विश्लेषण...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

बंडखोरीचे विश्लेषण

कितीही रोखा तरी वळवळतो,
असा बंडाचा किडा असतो.
जैसी करणी वैसी भरणी,
असा बंडाचा विडा असतो.

हळूहळू मुरत मुरत जाते,
असे बंडाचे लोण आहे.
मग बंडवाले बघत नाहीत,
आपल्यासमोर कोण आहे?

बंडाची क्रांती झाली तर,
तेच खरे बंडखोरीचे चीज असतो!
मागच्या बंडखोरीमध्ये,
पुढच्या बंडखोरीचे बीज असते!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6679
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
2जानेवारी2023
---------------------------------------
मराठी वात्रटिका
 

Sunday, January 1, 2023

वर्षांतर... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

वर्षांतर

पिल्याशिवाय आणि पाजल्याशिवाय,
जुने जात नाही आणि नवे येत नाही.
बाटली आणि ताटलीशिवाय,
निरोप आणि स्वागतही होत नाही.

निरोप आला आणि स्वागताला,
ग्लास बाटल्यांचा खळखळाट असतो!
ज्यांना निमित्त हवे असते,
त्यांचा तर खरा फळफळाट असतो!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8136
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
1जानेवारी 2023
 

शनिवार ऐतवार .... मराठी वात्रटिका


 आजची वात्रटिका
-----------------------
शनिवार ऐतवार
उत्सवप्रेमी लोकांसोबत,
काळाची बघा केवढी गट्टी आहे?
निरोपाच्या हँगओव्हरला,
नववर्षाच्या आरंभीच सुट्टी आहे.
ज्यांना बहाणा हवा असतो त्यांना,
उत्सवांचा उत्साह तर फार असतो!
तुमच्या आमच्या मनात मात्र,
नेहमीच शनिवार ऐतवार असतो !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6678
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18वे
1जानेवारी 2023

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...