Friday, November 24, 2023

दैनिक वात्रटिका24नोव्हेबर 2023....वर्ष- तिसरे..अंक -170वा

 दैनिक वात्रटिका
24नोव्हेबर 2023....वर्ष- तिसरे..
अंक -170वा 
अंक डाऊनलोड लिंक -

खुर्चीगामी....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

खुर्चीगामी

ना कुणी पुरोगामी आहेत,
ना कुणी प्रतिगामी आहेत.
तुमचा आमचा गोंधळ उडावा,
एवढे सगळेच नामी आहेत.

कुणाकुणाला वाटू शकते,
आमचे विचार मिर्चीगामी आहेत !
एक मात्र नक्की आहे,
राजकारणात फक्त खुर्चीगामी आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8401
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
24नोव्हेंबर2023
 

Thursday, November 23, 2023

दैनिक वात्रटिका23नोव्हेबर 2023....वर्ष- तिसरे..अंक -169 वा


दैनिक वात्रटिका
23नोव्हेबर 2023....वर्ष- तिसरे..
अंक -169 वा 
अंक डाऊनलोड लिंक -
 

ठकास महाठक....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
ठकास महाठक
आम्ही काही कधीच कुणाचे,
अवमूल्यन करत नाहीत.
पण लालची लोकांच्या राज्यात.
ठक उपाशी मरत नाहीत.
आम्ही ना ठकांचे प्रतिपादन,
ना बाजू रेटतो आहोत !
त्यामुळेच तर दरवेळी,
ठकाला महाठक भेटतो आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-8398
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
23नोव्हेंबर2023

 

Wednesday, November 22, 2023

दैनिक वात्रटिका22नोव्हेबर 2023....वर्ष- तिसरे..अंक -168 वा


 दैनिक वात्रटिका
22नोव्हेबर 2023....वर्ष- तिसरे..
अंक -168 वा 
अंक डाऊनलोड लिंक -

साडेसाती...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

साडेसाती

राजकारणाबरोबर क्रिकेटचे,
खरे तर खूप जुने नाते आहे.
विश्वकप 2023 च्या निमित्ताने,
त्याच्यावर शिक्कामोर्तब होते आहे.

सर्वच राजकारण्यांकडून विश्वकपाचा,
राजकारणासाठी सोयीने वापर आहे.
इतिहासात प्रथमच खेळाडू सोडून,
'पनवती' वर पराभवाचे खापर आहे.

अंधभक्त तर अंध आहेतच,
पण डोळसही अंध झाले हे अति आहे !
सगळाच गोंधळ उडालाय,
नेमकी कुणा मागे साडेसाती आहे ?

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8399
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
22नोव्हेंबर2023
 

Tuesday, November 21, 2023

दैनिक वात्रटिका21नोव्हेबर 2023....वर्ष- तिसरे..अंक -167 वा


दैनिक वात्रटिका
21नोव्हेबर 2023....वर्ष- तिसरे..
अंक -166 वा 
अंक डाऊनलोड लिंक -


 

बेडूक उड्या ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

बेडूक उड्या

खऱ्याबरोबर खोटी अस्मिता,
ज्याच्या त्याच्या उरात आहे.
जयंती आणि पुण्यतिथीचे,
राजकारणसुद्धा जोरात आहे.

आपल्या राष्ट्रीय महापुरुषांनाही,
जाती धर्माच्या बेड्या आहेत !
फुगलेल्या बेडकांच्या तर,
डबक्यातल्या डबक्यात उड्या आहेत!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8398
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
21नोव्हेंबर2023
 

Monday, November 20, 2023

दैनिक वात्रटिका20नोव्हेबर 2023....वर्ष- तिसरे..अंक -166वा


दैनिक वात्रटिका
20नोव्हेबर 2023....वर्ष- तिसरे..
अंक -165वा 
अंक डाऊनलोड लिंक -

 

खिलाडूवृत्तीचा बॅलन्स...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

खिलाडूवृत्तीचा बॅलन्स

जसा हरणाराही जिंकला जातो,
तसा जिंकणाराही हारला जातो.
म्हणूनच खेळ कोणताही असो,
उत्कंठावर्धक ठरला जातो.

कधी पराभवाचे दुःख असते,
कधी विजयाचीही धुंदी असते.
विजयाबरोबर पराभवाचीही,
प्रत्येकाला समान संधी असते.

विजय मिरवला तरी,
पराभव कुरवळला जाऊ नये !
जिंकणाराबरोबर हरणाचाही,
आत्मविश्वास ढळला जाऊ नये !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8397
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
20नोव्हेंबर2023
 

Sunday, November 19, 2023

दैनिक वात्रटिका19नोव्हेबर 2023....वर्ष- तिसरे..अंक -165वा


दैनिक वात्रटिका
19नोव्हेबर 2023....वर्ष- तिसरे..
अंक -164 वा 
अंक डाऊनलोड लिंक -
 

विरोधाभास...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
विरोधाभास
जसे इथे आग लावे आहेत,
तसे इथे गोड बोले आहेत.
एकदा आग लागली की,
आगीत तेल घाले आहेत.
जसे काही बोलघेवडे आहेत,
तसेच काहींचे माज मुके आहेत.
फक्त एवढेच नाही तर,
ते सगळेच सरणफुके आहेत.
सर्वांचेच विखारी इरादे,
अगदीच सर्वश्रुत आहेत !
तरीही त्यांचा दावा असतो,
तेच खरे शांततेचे दूत आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8396
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
19नोव्हेंबर2023

 

Saturday, November 18, 2023

डेंगी ताप...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

डेंगी ताप

अफवा आणि वावड्यांचा,
राजकारणाला तर शाप आहे.
त्यामुळेच म्हणायला लागले,
हा डेंगी ताप की सोंगी ताप आहे ?

डेंगी डास राष्ट्रवादी असावेत,
अशी विरोधकांना शंका आहे.
डासांची फक्त गुणगुण असते,
आता तर डासांचा डंका आहे.

निदान होऊनही कळेना,
कोणते गुपित लपलेले आहे !
त्यामुळेच डेंगीच्या आजाराने,
राजकारण तापलेले आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8395
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
18नोव्हेंबर2023
 

दैनिक वात्रटिका18नोव्हेबर 2023....वर्ष- तिसरे..अंक -164 वा


दैनिक वात्रटिका
18नोव्हेबर 2023....वर्ष- तिसरे..
अंक -164 वा 
अंक डाऊनलोड लिंक -
 

Friday, November 17, 2023

दैनिक वात्रटिका17नोव्हेबर 2023....वर्ष- तिसरे..अंक -163 वा


दैनिक वात्रटिका
17नोव्हेबर 2023....वर्ष- तिसरे..
अंक -163 वा 
अंक डाऊनलोड लिंक -
 

काळाचा महिमा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

काळाचा महिमा

राजकारणात काळही,
बघा कसा सूड घेऊ लागतो.
ज्याचा त्याचा भूतकाळ,
वर्तमान म्हणून पुढे येऊ लागतो.

जे भूतकाळात केले आहे,
तेच वर्तमानात भोगलेले असते !!
भूतकाळाच्या वर्तमानावर,
भविष्य पणाला लागलेले असते !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
दैनिक वात्रटिका
वर्ष -3 रे
17नोव्हेंबर2023
 

Thursday, November 16, 2023

दैनिक वात्रटिका16नोव्हेबर 2023....वर्ष- तिसरे..अंक -162 वा


दैनिक वात्रटिका
16नोव्हेबर 2023....वर्ष- तिसरे..
अंक -162 वा 
अंक डाऊनलोड लिंक -
 

ट्रोलिंग...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
ट्रोलिंग

ट्रोलर नावाचा धंदा,
हल्ली एकदम जोरात आहे.
सगळे कसे ऑनलाईन,
सगळी वाऱ्यावरची वरात आहे.
ब्रेनलेस आणि कॅशलेस,
बघा धंदा कैसा आहे ?
दर क्लिक आणि लाईकला,
इथे पैसा एके पैसा आहे.
टवाळकी आणि कुचाळकीला,
इथे पाहिजे तेवढा मोका आहे !
ज्याची पाहिजे त्याची,
इथे राजकीय शाखा आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
दैनिक वात्रटिका
वर्ष -3 रे
16नोव्हेंबर2023

 



Wednesday, November 15, 2023

दिवाळी धमाका...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

दिवाळी धमाका

एकमेकांची रहस्य,
पुन्हा नव्याने खोलू लागले.
कमरेखाली जात जात,
अंतर्वस्राला हात घालू लागले.

तुमच्या आमच्यासाठी,
हे धक्क्यावरती धक्के आहेत !
तेच सांगू लागले,
कुणाच्या अंतर्वस्रावर
कुणाचे शिक्के आहेत ?

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
दैनिक वात्रटिका
वर्ष -3 रे
15नोव्हेंबर2023
 

दैनिक वात्रटिका15नोव्हेबर 2023....वर्ष- तिसरे..अंक -161 वा


दैनिक वात्रटिका
15नोव्हेबर 2023....वर्ष- तिसरे..
अंक -161 वा 
अंक डाऊनलोड लिंक -
 

Tuesday, November 14, 2023

दैनिक वात्रटिका14नोव्हेबर 2023....वर्ष- तिसरे..अंक -160 वा


दैनिक वात्रटिका
14नोव्हेबर 2023....वर्ष- तिसरे..
अंक -160 वा 
अंक डाऊनलोड लिंक -
 

बंडखोरीचे बीज....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

बंडखोरीचे बीज

एकदा बंडखोरी पेरली की,
पुन्हा बंडखोरीच उगवत असते.
नव्या बंडाची आस,
जुनी बंडखोरीच जागवत असते.

बंडखोर समर्थकांना वाटू शकते,
ह्या तर निव्वळ फुणग्या आहेत!
बंडखोरांच्या छावण्या बघा,
तिचे बंडखोरीच्याच ठिणग्या आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
दैनिक वात्रटिका
वर्ष -3 रे
14नोव्हेंबर2023
 

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...