Wednesday, April 27, 2022

डेली रिपोर्ट...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

डेली रिपोर्ट

काही दिवस भोंग्याचे,
काही दिवस दंग्याचे आहेत.
आज कालचे दिवसच जणू,
नंग्यांचे आणि मेंग्यांचे आहेत.

नंगे नागवे नाचू शकतात,
त्याला कारणीभूत मेंगे आहेत !
कधीतरी उगारली जातात,
ते गोगलगायीचे शिंगे आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6460
दैनिक पुण्यनगरी
27एप्रिल2022

 

Tuesday, April 26, 2022

घरगुती देशद्रोह.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

घरगुती देशद्रोह

अजे झाले, मग दुजे झाले,
त्यापाठोपाठ चक्क तिजे झाले.
पुरणपोळ्याच्या स्वयंपाकाचे,
बायकोने चक्क भजे केले.

बायकोने आपला प्रताप,
असा पुन्हा पुन्हा दाखल केला.
बायकोवर चिडून नवऱ्याने,
देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला.

खाद्य संस्कृतीचा अपमान,
असा नवऱ्याने डाव साधला आहे.
बायकोनेही मग तेच केले,
ती विसरली आपला दादला आहे.

आज नवरा आणि बायकोही,
तुरुंगात खडी फोडीत आहेत !
हनुमान चालीसा म्हणत म्हणत,
गोडीत दिवस काढीत आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6459
दैनिक पुण्यनगरी
26एप्रिल2022

 

ताजा कलम...मराठी वात्रटिका


 आजची वात्रटिका

---------------------
ताजा कलम
लोकांचे वेगवेगळे अंदाज,
लोकांचे वेगवेगळे तर्कट आहे.
नेमके कोण?
कुणापेक्षा पोरकट आहे?
आपल्या जखमांवरती,
आता आपलेच मलम आहे!
अविश्वासाच्या थडग्यावर,
देशद्रोहाचे कलम आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-7912
दैनिक झुंजार नेता
26एप्रिल2022

Monday, April 25, 2022

मारुतीची शेपटी... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

मारुतीची शेपटी

हनुमानाचे शेपटीला,
मनसेची आग आहे.
हनुमान चालीसा वागणे,
ज्याला त्याला भाग आहे.

गाव जले हनुमान बाहर,
असाच हा मामला आहे.
भोंग्याच्या खेळामध्ये,
प्रत्येकजण रमला आहे.

कुणी पट्टीचा खेळाडू,
कुणाची मात्र आपटी आहे !
वाढतच चाललेली,
मारूतीची शेपटी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7910
दैनिक झुंजार नेता
25एप्रिल2022

 

ऑपरेशन जेल भरो...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------
ऑपरेशन जेल भरो

आजी टाकले,माजी टाकले,
मंत्री-संत्री तुरूंगात टाकले.
खासदार आणि आमदारही,
जोडी-जोडीने आत टाकले.

एकमेकांच्या साम्राज्याला,
एकमेकांकडून सुरुंग आहेत!
आ वासून बसलेले,
तुरुंग एके तुरुंग आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6458
दैनिक पुण्यनगरी
25एप्रिल2022

 

Sunday, April 24, 2022

पुरस्कार लीला... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

पुरस्कार लीला

पहिल्या पेक्षाही जास्त,
पुरस्कारांचे हसे होऊ लागले.
कुणीही कुणालाही,
कसलेही पुरस्कार देवू लागले.

छोटे मोठयाला,खरे खोट्याला,
पुरस्कार वाटु लागले !
ज्यांचा कुणाचा आदर वाटावा,
त्यांचे तिरस्कार वाटू लागले !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------
फेरफटका-7909
दैनिक झुंजार नेता
24एप्रिल2022

 

बजरंग बली !...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

बजरंग बली !

राजकारणात हनुमानाची,
हाल अपेष्टा व्हायला लागली,
हनुमान चालीसेची,
माकडचेष्टा व्हायला लागली.

माकडांच्या हाती कोलीत,
अशीच गत झाली आहे !
राजकीय कुरघोड्यामध्ये,
बिचारा बजरंग बली आहे!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6457
दैनिक पुण्यनगरी
24एप्रिल2022

 

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...