Wednesday, April 8, 2009

बुटमारी

******* वात्रटिका ******
********************

बुटमारी:संदर्भ-१

जगामध्ये जशी काय
बुटमारीची साथ आहे
शब्द हे शस्त्र ज्यांचे,
दुर्दैवाने त्यांचाच यात हात आहे.

सभ्य-असभ्यतेतला फ़रक
थोडाच काय कळणार नाही ?
कदाचित बुटासकट पत्रकारांना
कुठेही प्रवेश मिळणार नाही !
---------------------------

बुटमारी:संदर्भ-२

इथली व्यवस्थाच अशी की,
कुणाला समजून घेत नाही.
उगीच कुणाचा हात काही
पायातल्या जोड्याकडे जात नाही.

बगदाद्नने रचला पाया,
दिल्लीने कळस चढवला आहे !
त्यांना आता जोडेच खावे लागतील,
ज्यांनी सामान्य माणूस
पावलोपावली नडवला आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)

No comments:

दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 306 वा l पाने -57

दैनिक वात्रटिका - मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव दैनिक आजचा अंक  दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 306 वा l पान...