Thursday, April 2, 2009

००००००० वात्रटिका ०००००००
******************

राजकीय अंगवस्त्र

अस्तित्वाच्या लढाईत
पक्षांतर हे अस्त्र झाले
राजकीय पक्ष म्हणजे
नेत्यांचे अंगवस्त्र झाले.

पाहिजे तेंव्हा गुंडाळता येते,
पाहिजे तेंव्हा फ़ेडता येते !
आपल्या चवचालपणाचे नाते
लोकशाहीशी जोडता येते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)

No comments:

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...