Monday, April 20, 2009

जातीचे स्पिरीट

जातीचे स्पिरीट

पाहिजे तेंव्हा जात
जातीला खेटवता येते.
जाती-जातीचे स्पिरीट
पाहिजे तेंव्हा पेटवता येते.

मग चांगल्या चांगल्याच्याही
मनातली जात जागी होते !
जात आंधळी बनून,
जात जातीत सहभागी होते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)

No comments:

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...