Thursday, April 9, 2009

राजकीय बदमाशी

******* वात्रटिका ******
********************

राजकीय बदमाशी

कुणाच्या तोंडी तलवार,
कुणाच्या तोंडी रोड रोलर आहे.
राजकीय नेत्रुत्त्वाच्या बदमाशीचा
प्रचारामध्ये ट्रेलर आहे.

सारे एवढे सारखे की,
त्यांना भाऊ-भाऊ म्हणावे लागते !
दगडापेक्षा विटेलाच
लोकशाहीत मऊ म्हणावे लागते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)

1 comment:

प्रकाश बा. पिंपळे said...

amhi lahan pana pasun tumchya kavita wachto far awdatat!

दुष्काळी पाहुणचार ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- दुष्काळी पाहुणचार दुष्काळ पाहणी दौरा बघून, आमचे मतही ठाम झाले. एकाचा पाहुणचार करताना, दुसरेच हकन...