Monday, April 27, 2009

स्ट्राईक रोटेट

(******** आजची वात्रटिका********
***************************

स्ट्राईक रोटेट

त्याचा वन डे चा खेळ
ती कसोटी मागते
पिच वर टिकताना
त्याची कसोटी लागते.

मग कधी तो;कधी ती
डाव सांभाळून घेतात !
स्ट्राईक रोटेट केली की,
आपोआप धावा होतात !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...