Wednesday, April 1, 2009

वात्राटिका

--------------------------------------------------------------------------------


(१) भटक्यांचे वर्तमान

काही बहाद्दर असे की,
सारे पक्ष फ़िरून आलेत
जिथे जसे चरता येईल
तिथे तसे च्ररून आले.

त्यागाच्या कथा सांगताना
डोळे त्यांचे भरून आलेत
न झालेल्या अन्यायाचा
गाजावाजा ते करून आलेत.

शिरले तिथे मुरले नाहीत
तरीही मुरब्बी ठरून आलेत !
आज इथे नांदता नांदता
उद्याचाही घरोबा करून आलेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)

***********************
(२)प्रचार तंत्र

विकासात्मक मुद्द्य़ाच्या पेकाटात
जगजाहिरपणे लाथ घालतात
निवडणूका आल्या की,
भावनिक मुद्द्य़ांना हात घालतात.

हलक्या कानांच्या लोकांमुळेच
कानात गोष्टी फ़ुंकल्या जातात !
पोटापेक्षा ऒठावरील मुद्द्य़ांवरच
निवड्णूका जिंकल्या जातात !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)


(३)पाकीस्तानचे भविष्य़

विश्वास,शांतता,माणुसकीची
तिथे दाणादाण होत आहे
पाकीस्तान पाकीस्तान राहिला नाही

त्याचे अतिरेकीस्तान होत आहे.


त्यांनी केला घात त्यांचा
त्यात अतिरेक्यांचा काय दोष होता ?
इतिहासात एकच ओळ असेल,
इथे पाकीस्तान नावाचा देश होता !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
मोबा.9923847269

No comments:

दैनिक वात्रटिका24एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -322 वा

दैनिक वात्रटिका 24एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -322 वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1Lj6fYs7HXzulsl3-eEaC...