Wednesday, April 15, 2009

उलटलेले गुरुमंत्र

उलटलेले गुरुमंत्र

सत्तेच्या सारीपाटावरती
अघोरी डाव सुरु आहेत.
गुरुंच्या विरोधात शिष्य़,
शिष्य़ांच्या विरोधात गुरु आहेत.

गुरुची विद्या अशी
गुरुलाच फ़ळते आहे !
गुरुमंत्र उलट्ले की काय होते ?
हे पक्क्या गुरुलाच कळते आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...