Wednesday, April 15, 2009

वाचाळता आणि गचाळता

****** वात्रटिका ******
*******************

वाचाळता आणि गचाळता

वाचाळांना तोटा नाही
एकाचढ एक वाचाळ आहेत.
प्रचाराच्या पातळ्या तर
गचाळाहून गचाळ आहेत.

गचाळपणाचा कोणता नमुना
अजून पेश व्हायचा आहे ?
दुर्दैवाने त्यांच्याच हाती
आपला देश द्यायचा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)

No comments:

युद्ध प्रसंग....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- युद्ध प्रसंग पेट्रोल पंपा पंपावरची अवस्था, इंधन भरू किंवा मरू आहे. इंधन टंचाईमुळे खात्री झाली, आखा...