Tuesday, April 28, 2009

चार पर्याय

*********************
०००००० आजची वात्रटिका ०००००
*********************

चार पर्याय

एक करोड्चा सवाल
दस करोड्चा झाला
आणि आमची छपरंसुध्दा फ़ाड्ली गेली
प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय देण्याची
नवीन फ़्याशन पाड्ली गेली.

आता लहान -लहान पोरंही
टि.व्ही.तल्यासारखी वागू लागली !
बापाचे नाव विचारले तरी,
चार पर्याय मागू लागली !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

युद्ध प्रसंग....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- युद्ध प्रसंग पेट्रोल पंपा पंपावरची अवस्था, इंधन भरू किंवा मरू आहे. इंधन टंचाईमुळे खात्री झाली, आखा...