Friday, April 10, 2009

जातीची ढाल

****** वात्रटिका ******
******************

जातीची ढाल

ज्याच्या त्याच्या जातीची
एक वेगळीच चाल असते.
सगळे पर्याय संपले की,
जात नावाची ढाल असते.

वैयक्तिक स्वार्थही
जातीभोवती गुंफ़ले जातात !
मग मोती जातो सटकून,
हाती फ़क्त शिंपले राहतात !!

-सूर्यकांत डोळसे,पाटॊदा(बीड)

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...