Saturday, April 25, 2009

राजकीय आगडोंब

******* वात्रटिका********
*********************

राजकीय आगडोंब

राजकारणी देतात पेट्वून
मग गावं धगधगत राहतात
पेटलेल्या ज्वालांची मजा
मनसोक्तपणे बघत राहतात.

आपण पेटवले गेलोय
हे गावांनाही कळालेले असते !
तोपर्यंत गावांचे गावपण
मुळासकट जळालेले असते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)

No comments: